Home Bibles इब्री लोकांस 10:30 · मराठी बायबल
इब्री लोकांस 10:30 · मराठी बायबल

कारण त्याला ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.”पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.”

Cross references

अनुवाद 32:35

अनवधानाने त्यांच्याहातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहात आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन.’

स्तोत्रसंहिता 50:4

आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.

स्तोत्रसंहिता 94:1

परमेश्वरा, तू लोकांना शासन करणारा देव आहेस. असा तू देव आहेस जो येतो आणि लोकांसाठी शासन आणतो.

स्तोत्रसंहिता 96:13

परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.

स्तोत्रसंहिता 98:9

नद्यांनो, टाळ्या वाजवा पर्वतांनो, सगळ्यांनी बरोबर गाणे गा. [10] परमेश्वरासमोर गा. कारण तो जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने राज्य करेल, तो लोकांवर चांगुलपणाने राज्य करेल.

स्तोत्रसंहिता 135:14

परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली. पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.

यशया 59:17

परमेश्वराने युध्दाची तयारी केली. त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण घातले, शिक्षेचे कपडे घातले. दृढ प्रेमाचा अंगरखा घातला.

यशया 61:2

परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले.

यशया 63:4

मी लोकांना शिक्षा करण्यासाठी वेळ निश्चित केली. आता लोकांना वाचविण्याची आणि त्यांना संरक्षण देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.

यहेज्केल 18:30

का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.

यहेज्केल 34:17

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या - मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.

नहूम 1:2

परमेश्वर हा ईर्षावान देव आहे परमेश्वर अपराध्यांना शिक्षा करतो आणि तो खूप रागावतो परमेश्वर त्याच्या शत्रूंना शिक्षा करतो. तो त्याच्या शत्रूंवर रागावलेला असतो.

रोमकरांस 12:19

प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, देवाच्या रागाला वाट द्या. असे लिहिले आहे, “सूड घेणे माझ्याकडे आहे. मी फेड करीन असे प्रभु म्हणतो.’

रोमकरांस 13:4

होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे.

2 करिंथकरांस 5:10

कारण आम्हांला सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभे राहायचे आहे. आणि प्रत्येकाला त्याचे जे प्रतिफळ मिळणार आहे. म्हणजे शरीरात असताना ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी केल्या त्याप्रमाणे बक्षिस मिळेल.देवाचे मित्र होण्यासाठी लोकांना मदत करणे

Interlinear

Choose Theme