उत्पत्ति 7:19 · मराठी बायबल
पाणी इतके वर चढत गेले की उंच उंच पर्वत देखील पाण्यात बुडून गेले;
Cross references
ईयोब 12:15
देवाने जर पाऊस पडू दिला नाही तर पृथ्वी सुकून जाईल आणि जर त्याने पावसाला मोकळे सोडले तर सारी पृथ्वी जलमय होऊन जाईल.
स्तोत्रसंहिता 46:2
म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.
स्तोत्रसंहिता 104:6
तू तिला पाण्याने गोधडीसारखे आच्छादलेस, पाण्याने डोंगरही झाकले गेले.
यिर्मया 3:23
टेकड्यांवर मूर्तीची पूजा करणे मूर्खपणाचे आहे. डोंगरावर मोठ्या, दिखाऊ मेजवान्या करणे चूक आहे. इस्राएलचे पापविमोचन नक्कीच आपल्या परमेश्वर देवाकडून येईल.
2 पेत्र 3:6
जेव्हा मागे जग अस्तित्वात होते तेव्हा याच घटकणेमुळे महापूर येऊन पृथ्वीचा नाशझाला.