Home Bibles उत्पत्ति 50:5 · मराठी बायबल
उत्पत्ति 50:5 · मराठी बायबल

‘माझा बाप मरावयास टेकला असताना मी त्याला वचन दिले होते की मी त्याला कनान देशातील त्याने स्वत:साठी तयार केलेल्या गुहेत पुरेन. तेव्हा कृपया माझ्या बापास पुरावयास जाऊ द्या; मग मी परत आल्यावर तुम्हाला भेटेन.”‘

Cross references

उत्पत्ति 3:19

तू अतिशय श्रम करुन निढळाच्या घामाने भाकर मिळविशीलं तू मरायच्या दिवसापर्यंत अतिशय काम करशील. आणि नंतर तू पुन्हा माती होशीलं मी तुला मातीतून उत्पन्न केले आहे; आणि तू मरशील तेव्हा परत मातीला जाऊन मिळशील.”

उत्पत्ति 47:29

दिवस वाढत गेले तसे इस्राएलाने (याकोबाने) जाणले की आता आपण लवकर मरणार, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले; तो म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडिखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. जेव्हा मी मरेन तेव्हा मला मिसरमध्ये पुरु नको;

उत्पत्ति 47:31

मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा;” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली; मग इस्राएलाने (याकोबाने) आपले डोके मागे पलंगाच्या उशाकडे नम्रतेने लववून नमन केले.

उत्पत्ति 48:21

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “माझे शेवटचे दिवस आता अगदी जवळ आले आहेत, आता मी मरणार; परंतु देव सतत तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन जाईल.

उत्पत्ति 49:29

मग इस्राएलाने त्यांना आज्ञा दिली. तो म्हणाला, “मी मरेन तेव्हा तुम्ही मला माझ्या लोकात नेऊन ठेवावे. एफ्राम हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे.

उत्पत्ति 50:24

योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

अनुवाद 4:22

त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या व राहा.

1 शमुवेल 14:43

शौल त्याला म्हणाला, “तू काय केलेस ते सांग.”योनाथान म्हणाला, “कोठीच्या टोकावर मावेल एवढाच मध तेवढा मी चाखला त्यासाठी मी प्राणार्पण करायला हवे का?”

2 इतिहास 16:14

दावीदनगरात त्याने आधीच स्वत:साठी करुन घेतलेल्या कबरीत लोकांनी त्याचे दफन केले. विविध सुवासिक द्रव्ये आणि मसाले घातलेल्या बिछान्यावर लोकांनी त्याला ठेवले. त्याच्या सन्मानार्थ सुगंधी द्रव्ये जाळली.

ईयोब 30:23

तू मला माझ्या मृत्यूकडे नेत आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत माणसाला मरावे हे लागतेच.

स्तोत्रसंहिता 79:3

देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले. प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.

उपदेशक 6:3

एखादा माणूस खूप वर्षे जगेल आणि कदाचित त्याला 100 मुले असतील. परंतु जर तो माणूस चांगल्या गोष्टीत समाधानी नसला आणि तो मेल्यावर त्याची कोणाला आठवणही आली नाही तर जन्मत:च मेलेल्या मूल त्या माणसापेक्षा खूप बरे आहे असे मला वाटते.

उपदेशक 12:5

तुम्हाला उंचावरच्या ठिकाणांची भीती वाटेल. तुमच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक लहान वस्तूला अडखळून तुम्ही पडाल अशी तुम्हाला भीती वाटेल. बदामाच्या झाडांवरील फुलासारखे तुमचे केस पांढरे होतील. तुम्ही चालताना नाकतोडयासारखे स्वत:ला ओढाल. तुमची जगण्याची इच्छानाहीशी होईल आणि नंतर तुम्ही तुमच्या कायमच्या घरी (कबरेत) जाल. शोक करणारे लोकअत्यसंस्कारासाठी रस्त्यावर जमा होतील आणि तुमचे प्रेत स्मशानात नेतील.

उपदेशक 12:7

तुमचे शरीर मातीपासून निमाण झाले आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचे शरीर परत मातीला मिळेल. पण तुमचा आत्मा देवाकडून आला आणि जेव्हा तुम्ही मराल तेव्हा तुमचा आत्मा परत देवाकडे जाईल.

यशया 22:16

राजप्रासादातील त्या नोकराला जाब विचार, ‘येथे काय करीत आहेस? तुझ्या कुटुंबातील कोणाचे येथे दफन केले आहे का? तू येथे थडगे का खणीत आहेस?”यशया म्हणाला, “हा माणूस पाहा, हा स्वत:चे थडगे महत्वाच्या जागी खणत आहे. खडक फोडून तो स्वत:चे थडगे खणत आहे.”

मत्तय 8:21

मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”

मत्तय 27:60

मग योसेफाने खडकात खोदलेल्या नव्या कबरेत येशूचे शरीर ठेवले. नंतर कबरेच्या तोंडवर एक मोठी धोंड लोटून ती कबर बंद केली. या गोष्टी केल्यानंतर योसेफ निघून गेला.

लूक 9:59

तो दुसऱ्या एकाला म्हणाला, “माझ्यामागे ये.” पण तो मनुष्य म्हणाला, “पहिल्यांदा मला जाऊ दे आणि माझ्या वडिलांना पुरु दे.”

Interlinear

Choose Theme