Home Bibles उत्पत्ति 50:23 · मराठी बायबल
उत्पत्ति 50:23 · मराठी बायबल

योसेफाच्या हयातीत एफ्राईमाला मुले व नातवंडे झाली; आणि त्याचा मुलगा मनश्शे याला माखीर नावाचा मुलगा झाला. योसेफाने मारखीराची मुले ही पाहिली.

Cross references

उत्पत्ति 30:3

मग राहेल म्हणाली, “तुम्ही माझी दासी बिल्हा उपपत्नी म्हणून घ्या; तुम्ही तिच्याजवळ निजा; मग ती माझ्या मांडीवर बाळंत होईल व तिजपासून मला मूल मिळेल; तिच्यामुळे मग मलाही मुलगा होईल आणि मी आई होईन.”

उत्पत्ति 48:19

परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”

उत्पत्ति 49:12

द्राक्षमद्य घेतल्याने त्याचे डोळे त्या द्राक्षमद्यापेक्षा अधिक लालबुंद होतील; त्याचे दात दूधपिण्यामुळे दूधापेक्षा अधिक सफेद होतील.”

गणना 32:33

तेव्हा मोशेने ती जमीन गादच्या, रऊबेनच्या लोकांना आणि मनश्शेच्या कुटुंबातील अर्ध्या लोकांना दिली. (मनश्शे योसेफचा मुलगा होता.) त्या प्रदेशात अमोऱ्याचा राजा सीहोन आणि बाशानाचा राजा ओग यांच्या राज्याचा त्या भूमीत समावेश होता. त्यांत आजुबाजूच्या प्रदेशातील शहरे होती.

गणना 32:39

माखीरच्या कुटुंबातील लोक गिलादला गेले (माखीर मनश्शेचा मुलगा होता.) त्यांनी त्या शहराचा पराभव केला. तेथे राहणाऱ्या आमोरी लोकांचा त्यांनी पराभव केला.

यहोशवा 17:1

मनश्शेच्या वंशजांनाही जमिनीत वाटा मिळाला. मनश्शे हा योसेफचा मोठा मुलगा. आणि गिलादचा पुढारी माखीर म्हणजे मनश्शेचा मोठा मुलगा. माखीर हा मोठा लढवय्या होता. तेव्हा गिलाद आणि बाशान हे प्रदेश माखीर कुटुंबाला मिळाले.

1 इतिहास 7:14

मनश्शेचे वंशज खालील प्रमाणे:मनश्शे आणि त्याची अरामी दासी यांना अस्रीएल नावाचा मुलगा होता. माखीर हाही आणखी एक मुलगा होता. माखीर म्हणजे गिलादचा बाप.

ईयोब 42:16

अशा तऱ्हेने ईयोब 140 वर्षे जगला. तो त्याची मुले, नातवंडे, पंतवंडे पाहीपर्यंत जगला.

स्तोत्रसंहिता 128:6

आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.

नीतिसूत्रे 17:6

नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.

Interlinear

Choose Theme