परंतु त्याचा बाप आपले म्हणणे कायम ठेवत पुढे म्हणाला, “माझ्या मुला! मला माहीत आहे; होय मला माहित आहे की मनश्शे हा प्रथम जन्मलेला आहे; आणि तो महान होईल; तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल म्हणजे त्याच्यापासून अनेक राष्ट्रे उदयास येतील, परंतु धाकटा भाऊ थोरल्या पेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.”
Cross references
“तू मला इश्माएल विषयी विचारलेस ते मी ऐकले; मी त्याला आशीर्वाद देईन; त्याला भरपूर संतती होईल; बारा महान सरदारांचा तो पिता होईल; त्याचे कुटुंब म्हणजे एक मोठे राष्ट्र होईल;
परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्राचे राज्यकर्ते तुझ्या उदरातून जन्म घेतील; एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल; वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”
एसाव इसहाकाचा आवडता होता; त्याने शिकार करुन आणलेल्या प्राण्यांचे मांस खाणे इसहाकाला आवडत असे; परंतु याकोब रिबकेचा आवडता होता.
परंतु इस्राएलाने आपल्या उजव्या डाव्या हातांची घडी टाकून अदलाबदल केली आणि आपला उजवा हात त्याने धाकटया मुलाच्या म्हणजे एफ्राईमाच्या डोक्यावर ठेवला व डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला;
3ती मोजदाद एकूण चाळीस हजार पाचशे भरली.
त्याच्या दलात चाळीस हजार पाचशे लोक होते.
आणि आता तर तुमची संख्या कितीतरी वाढली आहे. परमेश्वर देवाच्या कृपेने ती वाढून आकाशातील ताऱ्यांइतकी झाली आहे.
योसेफ माजलेल्या बैलासारखा आहे. त्याचे दोन पुत्र बैलाच्या शिंगांप्रमाणे आहेत. ते लोकांवर चढाई करुन त्यांना पृथ्वीच्या सीमेपर्यंत ढकलतील. असे मनश्शेचे हजारो आणि एफ्राइमचे लाखो आहेत.”
अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले,परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो
पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द लढण्यास भाग पाडील.
“पारसी, लूदी व पूटी लोक तुझ्या सैन्यात होते. तेच तुझे लढवय्ये वीर होते. आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्या तटबंदीवर टांगीत त्यांनी तुझ्या शहराला मान व वैभव प्राप्त करुन दिले.
अशेर वंशातील 12,000 लोकांनानफताली वंशातील 12,000 लोकांनामनश्शे वंशातील 12,000 लोकांना
जबुलून वंशातील 12,000 लोकांनायोसेफ वंशातील 12,000 लोकांनाबन्यामिन वंशातील 12,000 लोकांना