पण खरे म्हणजे तू परमेश्वराला भ्यायला पाहिजेस. का? कारण परमेश्वर तुझ्या वाट्याला काही काळ क्लेश देईल. ते क्लेश यहूदातून एफ्राइमच्या निघून जाण्याच्या वेळेप्रमाणे असतील, त्यानंतर असे क्लेश आताच तुमच्या वाट्याला येतील. तुझ्या वडिलांच्या वंशजांना आणि तुझ्या प्रजेला हे क्लेश सोसावे लागतील. देव काय करील बरे? देव अश्शूरच्या राजाला तुझ्याविरूध्द लढण्यास भाग पाडील.
Cross references
नवा राजा आपले म्हणणे मानत नाही हे इस्राएली लोकांच्या लक्षात आले. तेव्हा ते राजाला म्हणाले, “आम्ही दावीदाच्या घराण्यातील थोडेच आहोत. काय? नाही! इशायच्या जमिनीत आम्हाला थोडाच वाटा मिळणार आहे काय? नाही! तेव्हा इस्राएलींनो, जा आपापल्या घरी. करु दे या दावीदाच्या मुलाला आपल्या घराण्यापुरतेच राज्य.” एवढे बोलून ते निघून गेले.
इस्रएल लोकांनी दावीदच्या घराण्याविरुध्द बंड पुकारले. आजही त्या घराण्याशी त्यांचे वैर आहे.
अहाजचा मुलगा हिज्कीया हा यहूदाचा राजा झाला. एलाचा मुलगा होशे याच्या इस्राएलवरील सत्तेचे तेव्हा तिसरे वर्ष होते.
हिज्कीयाच्या चौदाव्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहूदातील सर्व मजबूत नगरांवर हल्ला चढवला. सर्व नगरांचा त्याने पाडाव केला.
राजा रहबामने आपल्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले हे इस्राएल लोकांच्या लक्षात आले. ते राजाला म्हणले, “आम्ही काय दावीदाच्या घराण्यातले आहोत का? मुळीच नाही! इशायच्या जमिनीत आमचा वाटा आहे का? नाही! तेव्हा इस्राएल लोकांनो, आपण आपले आपापल्या घरी जाऊ या दावीदाच्या मुलाला आपल्या घरच्यांवरच राज्य करु द्या.” सर्व इस्राएल लोक मग घरोघर गेले.
परमेश्वराने यहूदाला संकटांनी जेरीला आणले कारण यहूदाचा राजा आहाज याने यहूद्यांना दुर्वर्तनाला प्रवृत्त केले होते. आहाजने परमेश्वराचे उल्लंघन केले होते.
हिज्कीयाने परमेश्वरावर भरवंसा ठेवून केलेल्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात उतरल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब यहूदावर चाल करुन आला. नगराच्या तटबंदीबाहेर त्याने आपल्या सैन्यासह तळ ठोकला. आतील नगरांचा पाडाव करुन ती जिंकून घ्यायचा त्याने बेत केला.
तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदावर हल्ला केला. त्याने यहोयाकीमला कैद केले आणि त्याला पितळी बेड्या ठोकल्या. तशा अवस्थेत त्याला नबुखद्नेस्सरने बाबेलला नेले.
हे देवा, तू महान देव आहेस. दरारा उत्पन्न करणारा आणि पराक्रमी योध्दा आहेस तू निष्ठा बाळगणारा आहेस. तू करार पाळतोस आमच्यावर अनेक आपत्ती आल्या आणि आमच्या अडचर्णीना तू महत्व देतोस आम्ही सर्वजण, आमचे राजे आणि नेते, आमचे याजक आणि संदेष्टे या सर्वांवर अरिष्ट आले. अश्शूर राजाच्या काळापासून आजतागायत भयानक गोष्टी ओढवल्या.
पण मी, परमेश्वर, अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व शक्तीनीशी तुमच्यावर आक्रमण करण्यास भाग पाडीन. युफ्राटिस नदीच्या लोंढ्याप्रमाणे ते येतील. पुराचे पाणी चढत जाऊन नदीच्या किनाऱ्यावरून बाहेर ओसंडून वाहते तसेच ते येतील.
देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
हिज्कीया यहुदाचा राजा होता. सन्हेरीब अश्शूरचा राजा होता. हिज्कीयाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी सन्हेरीबने यहुदाच्या तटबंदी असलेल्या नगरांविरूध्द उठाव केला आणि त्यांचा पाडाव केला.