Home Bibles उत्पत्ति 45:26 · मराठी बायबल
उत्पत्ति 45:26 · मराठी बायबल

त्यांनी आपल्या बापास सांगितले, “बाबा! बाबा! तुमचा मुलगा योसेफ अजून जिवंत आहे आणि तो अवघ्या मिसर देशाचा प्रशासक म्हणजे प्रमुख अधिकारी आहे.” हे ऐकून त्यांच्या बापाला भोवळ आली.त्यांच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना!

Cross references

उत्पत्ति 37:35

याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलीनीं त्याचे सांत्वन करण्यास खूप प्रयत्न केला खरा परंतु तो कधीही समाधान पावला नाही; तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याच्या बापाने योसेफाकरिता अतिशय शोक केला.

उत्पत्ति 42:29

ते भाऊ कनान देशास आपला बाप याकोब याजकडे गेले आणि त्यांनी घडलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या.

उत्पत्ति 42:36

याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”

उत्पत्ति 42:38

परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

उत्पत्ति 44:28

आणि त्यातल्या एकाला मी पाहिले तो वन्यपशूद्वारे मारला गेला. पुन्हा तो कोणाच्या दष्टीस पडला नाही.

उत्पत्ति 45:8

मला येथे पाठवण्यात तुमचा दोष नव्हता तर ही देवाची योजना होती. देवाने मला फारोच्या बापासमान केले आहे; त्यामुळे मी फारोच्या घरदाराचा स्वामी आणि सर्व मिसर देशाचा प्रशासक झालो आहे.”

उत्पत्ति 48:11

मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण पाहा! देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.”

ईयोब 9:16

मी हाक मारल्यानंतर त्याने ओ दिली तरी तो माझे ऐकतो यावर मी विश्वास ठेवणार नाही.

ईयोब 29:24

काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले.

स्तोत्रसंहिता 105:21

त्याने योसेफला आपल्या घराचा मुख्य नेमले. योसेफने त्याच्या मालकीच्या सर्व वस्तूंची काळजी घेतली.

स्तोत्रसंहिता 126:1

परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.

योना 2:7

“माझ्या आत्म्याने सर्व आशा सोडून दिल्या होत्या पण मग मला परमेश्वराचे स्मरण झाले परमेश्वरा, मी तुझी प्रार्थना केली आणि तुझ्या पवित्र मंदिरात ती तू ऐकलीस.

लूक 24:11

पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

लूक 24:34

प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

लूक 24:41

ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”

Interlinear

Choose Theme