उत्पत्ति 4:23 · मराठी बायबल
लामेख आपल्या बायकांना म्हणाला,“आदा आणि सिल्ला माझी वाणी ऐका; लामेखाच्या बायकांनो, मी ज्या गोष्टी बोलतो तिकडे कान द्दा; एका माणसाने मला जखमी केले, तेव्हा मी त्याला ठार मारले, एका तरुणाने मला मारले म्हणून मी त्याला ठार केले.
Cross references
निर्गम 20:13
“कोणाचाही खून करु नकोस.
लेवीय 19:18
लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
गणना 23:18
नंतर बलाम या गोष्टी म्हणाला, “बालाका उभा रहा आणि मी काय सांगतो ते ऐक. सिप्पोरेच्या मुला, बालाका, मी सांगतो ते ऐक:
शास्ते 9:7
हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेले.”