Home Bibles उत्पत्ति 4:22 · मराठी बायबल
उत्पत्ति 4:22 · मराठी बायबल

सिल्ला हिला तुबल - काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.

Cross references

निर्गम 25:3

लोकांकडून तू माझ्याकरता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी; सोने, चांदी, पितळ;

गणना 31:22

लोखंड, पत्रा किंवा शिसे अग्नीत टाकले पाहिजे. नंतर त्या वस्तू खास पाण्याने धुवाव्यात म्हणजे त्या शुद्ध होतील. जर काही वस्तू अग्नीत टाकता येत नसतील तर त्या तुम्ही विशिष्ट पाण्याने धुवाव्यात.

अनुवाद 8:9

येथे मुबलक धान्य आहे. कोणत्याही गोष्टीची तुम्हाला उणीव नाही. येथील दगड लोहयुक्त आहोत. तुम्हाला डोंगरातील तांबे खणून काढता येईल.

अनुवाद 33:25

तुमच्या दरवाजांचे अडसर लोखंडाचे व पितळेचे असोत. तुमचे सामर्थ्य आयुष्यभर राहो.”

2 इतिहास 2:7

“तर, सोने, चांदी, पितळ आणि लोखंड या धातुकामात प्रवीण असा कारागिर तुम्ही माझ्याकडे पाठवून दिलात तर बरे. त्याला जांभळे, किरमिजी आणि निळे वस्त्र करता यावे. कोरीव कामाचेही त्याला चांगले शिक्षण मिळालेले असावे. माझ्या वडलांनी निवडलेल्या इतर कारागिरांबरोबर तो इथे यहूदा आणि यरुशलेममध्ये काम करील.

Interlinear

Choose Theme