Home Bibles उत्पत्ति 37:13 · मराठी बायबल
उत्पत्ति 37:13 · मराठी बायबल

याकोब योसेफाला म्हणाला, “तुझे भाऊ शखेम येथे आपल्या मेंढाराबरोबर आहेत; तू तेथे जा.”योसेफ म्हणाला, “बर, मी जातो.”

Cross references

उत्पत्ति 22:1

या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे”

उत्पत्ति 22:11

परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”

उत्पत्ति 27:1

इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली व त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले,“एसावा, माझ्या मुला;”आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे”

उत्पत्ति 27:18

ते घेऊन याकोब आपल्या बापाकडे गेला आणि त्याने बापाला हाक मारली, “बाबा!”त्याचा बाप म्हणाला, “काय मुला; तू कोण आहेस?”

1 शमुवेल 3:4

तेव्हा परमेश्वराने शमुवेलला हाक मारली. शमुवेल म्हणाला, “मी येथे आहे”

1 शमुवेल 3:8

परमेश्वराने शमुवेलला तिसऱ्यांदा हाक मारली. शमुवेल पुन्हा उठून एलीकडे गेला. मला बोलवलेत म्हणून मी आलो असे त्याने सांगितले.परमेश्वरच या मुलाला हाक मारत आहे हे आता एलीच्या लक्षात आले.

1 शमुवेल 3:16

पण एलीनेच शमुवेलला प्रेमाने हाक मारुन जवळ बोलावले. तेव्हा शमुवेल आज्ञाधारकपणे जवळ उभा राहिला.

1 शमुवेल 17:17

एक दिवस इशाय दावीदला म्हणाला, “आपल्या भावांसाठी एवढं टोपलंभर शिजवलेले धान्य आणि हे दहा पावाच्या लाद्या छावणीवर घेऊन जा.

मत्तय 10:16

“लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा.

लूक 20:13

द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, “मी काय करु? मी माझा स्वत:चा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्याला मान देतील.

इफिसकरांस 6:1

मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे.

Interlinear

Choose Theme