Home Bibles उत्पत्ति 27:1 · मराठी बायबल
उत्पत्ति 27:1 · मराठी बायबल

इसहाक म्हातारा झाल्यावर त्याची दृष्टि मंद झाली व त्याला स्पष्ट दिसेनासे झाले; एके दिवशी त्याने आपला वडील मुलगा एसाव याला बोलावून म्हटले,“एसावा, माझ्या मुला;”आणि एसाव म्हणाला, “मी येथे आहे”

Cross references

उत्पत्ति 25:23

परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्राचे राज्यकर्ते तुझ्या उदरातून जन्म घेतील; एक मुलगा दुसऱ्यापेक्षा बलवान होईल; वडील मुलगा धाकट्याची सेवा करील.”

उत्पत्ति 48:10

इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्याला चांगले स्पष्ट दिसत नव्हते; तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले.

1 शमुवेल 3:2

एलीची दृष्टी आता अधू झाल्यामुळे तो जवळजवळ आंधळाच झाला होता. एकदा तो रात्री झोपला होता.

1 राजे 14:4

मग राजाने सांगितल्यावरुन त्याची बायको शिलोला अहीया या संदेष्ट्याच्या घरी गेली. अहीया खूप वृध्द झाला होता आणि म्हातारपणामुळे त्याला अंधत्वही आले होते.

उपदेशक 12:3

त्या वेळी तुमच्या बाहूतील शक्ती निधून गेलेली असेल. तुमचे पाय अशक्त होतील आणि ते वाकतील. तुमचे दात पडतील. आणि तुम्हाला खाता येणार नाही. तुमचे डोळे स्पष्टपणे बघू शकणार नाहीत.

योहान 9:3

येशूने उत्तर दिले, “त्याच्या स्वत:च्या पापामुळे अगर त्याच्या आईवडीलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही. मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला.

Interlinear

Choose Theme