Home Bibles उत्पत्ति 36:15 · मराठी बायबल
उत्पत्ति 36:15 · मराठी बायबल

एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे -एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज

Cross references

उत्पत्ति 36:4

एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.

उत्पत्ति 36:11

अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;

उत्पत्ति 36:18

एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;

निर्गम 15:15

मग अदोमाची कुटुंबे व मवाबाचे बलवान लोक भीतीने थरथरा कांपतील आणि कनानी लोकांचे धैर्य पावेल.

1 इतिहास 1:35

एसावाचे मुलगे पुढीलप्रमाणे: अलीपाज, रगुवेल, यऊश, यालाम, कोरह.

1 इतिहास 1:45

योबाब मरण पावल्यानंतर त्याच्या जागी हूशाम गादीवर आला. हा तेमानी देशातील होता.

1 इतिहास 1:51

पुढे हदाद वारला. नंतर तिम्रा, आल्या, यतेथ,

ईयोब 2:11

ईयोबचे तीन मित्र म्हणजे अलीफज तेमानी, बिल्दद शूही आणि शोफर नामाथी या तिन्ही मित्रांनी ईयोब वर आलेल्या संकटांविषयी ऐकले होते. ते आपली घरे सोडून एका ठिकाणी भेटले. ईयोबला भेटून त्याला सहानुभूती दाखवावी व त्याचे सांत्वन करावे याबद्दल त्यांचे एकमत झाले.

ईयोब 4:1

तेमानच्या अलिफाजाने उत्तर दिले:“मी काहीतरी बोललेच पाहिजे. मी जर काही म्हटले तर तू अस्वस्थ होशील का?”

ईयोब 21:8

दुष्ट माणसे आपली मुले बाळे मोठी होत असलेली बघतात. आपली नातवंडे बघायला ती जिवंत राहतात.

स्तोत्रसंहिता 37:35

मी फोफावलेल्या सशक्त झाडासारखा दुष्टमाणूस पाहिला होता.

यिर्मया 49:7

हा संदेश अदोमसाठी आहेसर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का?

यिर्मया 49:20

म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.

यहेज्केल 25:13

म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो: “मी अदोमला शिक्षा करीन. मी अदोमवासीयांचा व तेथील प्राण्यांचा नाश करीन. तेमानापासून ददानापर्यंत सर्व अदोम देशाचा मी नाश करीन. अदोमची माणसे लढाईत मारली जातील.

आमोस 1:12

म्हणून मी तेमानला आग लावीन. त्यात बस्राचे मनोरे नष्ट करीन.”

ओबद्या 1:9

तेमान, तुझे सामर्थ्यशाली पुरुष भयभीत होतील. एसावच्या पर्वतावरील प्रत्येकाचा नाश होईल. पुष्कळ लोक मारलो जातील.

हबक्कूक 3:3

तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.

Interlinear

Choose Theme