Cross references
अलीपाजाला पांच मुलगे होते; तेमान, ओमार, सपो, गाताम व कनाज;
बेला मेल्यावर बस्रा येथील जेरहाचा मुलगा योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.
बेलाच्या निधनानंतर जेरहचा मुलगा योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.
बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवारमाखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्तानेभरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाशकरण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे.
हा संदेश अदोमसाठी आहेसर्वशक्तिमान परमेश्वर म्हणतो: “तेमानमध्ये जरासुद्धा शहाणपण उरले नाही का? अदोमचे सुज्ञ लोक चांगला सल्ला देऊ शकत नाहीत का? त्यांनी त्यांचे शहाणपण गमावले का?
परमेश्वर म्हणतो, “माझ्या अधिकारात मी वचन देतो की बसऱ्याचा नाश होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. दुसऱ्या शहरांना शाप देताना लोक बसऱ्याचे नाव उच्चारतील. लोक त्याचा अपमान करतील आणि त्याभोवतालची गावेसुद्धा कायमची नाश पावतील.”
म्हणून अदोमच्या लोकांसाठी परमेश्वराने आखलेला बेत काय आहे तो ऐका: तेमानच्या लोकांचे काय करायचे ते परमेश्वराने ठरविले आहे. ते काय ठरविले आहे तेही ऐका. शत्रू अदोमच्या कळपातून (लोकांतून) लहान लेकरांना ओढून नेईल. त्यांनी केलेल्या कृत्यांमुळे अदोमची कुरणे ओसाड बनतील.
हेरलेल्या सावजावर घिरटया घालणाऱ्या गरुडाप्रमाणे परमेश्वर आहे. परमेश्वर, गरुडाप्रमाणे, आपले पंख बसऱ्यावर पसरेल. त्या वेळी अदोमचे सैनिक फार भयभीत होतील प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे शूर सैनिक भीतीने रडतील.
तेमान, तुझे सामर्थ्यशाली पुरुष भयभीत होतील. एसावच्या पर्वतावरील प्रत्येकाचा नाश होईल. पुष्कळ लोक मारलो जातील.