दीना ही लेआ व याकोब यांची मुलगी होती. एके दिवशी ती त्या देशाच्या स्त्रियांना पाहाण्यास बाहेर गेली.
Cross references
एसाव चालीस वर्षांचा झाल्यावर त्याने दोन हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नांव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नांव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी;
मग रिबका इसहाकाला म्हणाली, “तुमचा मुलगा एसाव याने हेथी स्त्रीयांशी लग्न केले, मला त्यांच्यामुळे जीव नकोसा झाला आहे, कारण त्या काही आपल्यापैकी नाहीत; जर याकोबाने ही यांच्या सारख्या स्थानिक स्त्रीयांशीं लग्न केले तर मात्र मी मेलेलीच बरी.”
एसावाला कळले की आपला बाप इसहाक याने याकोबला आपला आशीर्वाद दिला, व याकोबाने कोणत्याच कनानी स्त्रिशी लग्न करु नये अशी आज्ञा दिली, तसेच बायको शोधण्यासठी त्याने याकोबाला पदन अराम येथे पाठवून दिले;
तेव्हा लेआ म्हणाली, “आता मला खूप आनंद झाला आहे! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील” मग तिने त्याचे नाव आशेर ठेवले.
त्यानंतर लेआला एक मुलगी झाली; तिने तिचे नाव दीना ठेवले
हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.
मन बदलणे तुला अगदी सोपे आहे. अश्शूरने तुझी निराशा केली, म्हणून तू अश्शूरला सोडले आणि मदतीसाठी तू मिसरला गेलीस. पण मिसरसुध्दा तुझी निराशा करील.
आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वत:ला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
त्यांनी शहाणे व शुद्ध असण्यास, त्यांच्या घराची काळजी घेण्यास व दयाळू असण्यास, आपल्या पतींच्या अधीन असण्यास शिकवावे. यासाठी की देवाच्या संदेशाची कोणालाही निंदा करता येऊ नये.