तेव्हा तू आता येथून नीघ, व पदल अरामात बथुवेल तुझ्या आईचे वडील बथुवेल याच्या कडे जा. तुझ्या आईचा भाऊ लाबान तेथे राहातो आणि त्याच्या मुलीपैकीच एकीशी लग्न कर.
Cross references
या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेतच.
बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ मुलगे झाले;
माझ्या देशाला, माझ्या लोकांकडे जा आणि तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी शोधून तिला येथे आण.”
अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम - नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला.
मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिहीपाशी आली;
रिबकेला लाबान नावाचा भाऊ होता; सेवक तिच्याशी ज्या गोष्टी बोलला त्या तिने त्याला सांगितल्या; या सगळ्या तो शांतपणे ऐकत होत; आणि जेव्हा त्याने आपल्या बहिणीच्या बोटातील सोन्याची आंगठी, व हातातील सोन्याच्या बांगड्या पाहिल्या तेव्हा तो घरातून निघून पळत विहिरीकडे गेला; तेव्हा उंटा जवळ उभा असलेला तो सेवक त्याला विहिरीपाशी दिसला.
मग लाबान व बथुवेल यांनी उत्तर दिले, “आपण परमेश्वराच्या प्रेरणेने आला आहा हे आम्ही समजतो; जे त्याच्या इच्छेप्रमाणे घडलेच पाहिजे ते आम्ही बदलू शकत नाही;
तो चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन अराम येथील अरामी बथुवेलाची कन्या व लाबान याची बहीण रिबका इजशी लग्न केले.
अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.
नंतर याकोबाने आपला प्रवास पुढे चालून ठेवला. तो पूर्वेकडील प्रदेशात गेला.
नंतर आपला बाप राहात होता त्या कनान देशास परत जाण्यासाठी त्यांनी प्रवास सुरु केला; याकोबाच्या मालकीच्या जनावरांचे कळप त्यांच्यापुढे चालले, पदन अराम येथे राहात असताना त्याने मिळवलेली सर्व मालमत्ता त्याने आपल्या बरोबर नेली.
तू माझ्यावर दया केली आहेस आणि माझ्या करिता अनेक चांगल्या गोष्टी केल्या आहेस हे मी जाणतो. मी पहिल्याच वेळी यार्देन नदी उतरुन प्रवास केला तेव्हा माझ्याजवळ एका काठी शिवाय माझ्या मालकीचे काहीही नव्हते; परंतु आता माझ्या मालकीच्या, भरपूर वस्तूंच्या व माणसांच्या पूर्ण दोन टोळ्या आहेत.
पदन अराम येथून याकोब परत आल्यावर देवाने त्याला पुन्हा दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
हे सहा मुलगे व मुलगी दीना ही लेकरे याकोबापासून लेआला पदन-अरामात झाली; त्या कुटुंबात तेहतीस जण होते.
“याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या.
पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले.