या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची बायको मिल्का यांनाही आता मुले झाली आहेतच.
Cross references
तेरह सत्तर वर्षांचा झाल्यावर त्याचे मुलगे अब्राम, हारान व नाहोर हे जन्मले.
तेरहच्या कुळाची वंशावळ येणेप्रमाणे: तेरहाला अब्राम, नाहोर व हारान हे मुलगे होते. हारानाचा मुलगा लोट.
अब्राम व नाहोर या दोघांनीही लग्न केले; अब्रामाच्या बायकोचे नाव साराय आणि नाहोरच्या बायाकोचे नाव मिल्का होते; मिल्का ही हारानाची मुलगी होती; हा हारान मील्का व इस्का यांचा बाप होता.
या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
अब्राहामाचे दहा उंट घेऊन त्याचा सेवक निघाला; त्याने आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर व मोलवान वस्तू देणग्या देण्यासाठी घेतल्या; तो अराम - नहाराईम मेसोपोटेमीयातील (म्हणजे मसोपटेम्या) नाहोर राहात असलेल्या नगरात गेला.
मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिहीपाशी आली;
रिबकेने उत्तर दिले, “नाहोर व मिल्का यांचा मुलगा बथुवेल याची मी कन्या;” आणखी ती पुढे म्हणाली,
जर आपण हा करार मोडल्याचा दोष करु तर अब्राहामाचा देव, नाहोराचा देव आणि त्यांच्या पितरांचा देव आमचा न्याय करो व आम्हास दोषी ठरवो.”याकोबाचा बाप, इसहाक देवाला “भय” म्हणत असे म्हणून याकोबाने “भय” हे नाव वापरुन शपथ घेतली.
खूप लांबच्या स्थळाहून आलेली, चांगली बातमी ही तुमच्या नहानलेल्या जीवाला थंडगार पाण्यासारखी असते.