Home Bibles उत्पत्ति 25:25 · मराठी बायबल
उत्पत्ति 25:25 · मराठी बायबल

पहिला मुलगा तांबूस रंगाचा होता, त्याचे अंग जणूकाय केसाळ झग्यासारखे होते; म्हणून त्याचे नाव एसाव (म्हणजे केसाळ) असे ठेवले.

Cross references

उत्पत्ति 27:11

परंतु याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, “माझा भाऊ केसाळ अंगाचा आहे; मी त्याच्या सारखा केसाळ अंगाचा नाही;

उत्पत्ति 27:16

तसेच तिने करडांचे कातडे याकोबाच्या हातावर व मानेवर लावले;

उत्पत्ति 27:23

तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

गणना 20:14

मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमच्या राजाकडे काही लोकांना एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता: “तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात: आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.

अनुवाद 23:8

अदोमी आणि मिसरी यांच्या तिसऱ्या पिढीपासूनच्या लोकांना इस्राएलांबरोबर परमेश्वराच्या प्रार्थनेत सहभागी व्हायला हरकत नाही.

1 इतिहास 1:34

इसहाक हा अब्राहामचा मुलगा. एसाव आणि इस्राएल (याकोब) हे इसहाकचे मुलगे.

मलाखी 1:2

परमेश्वर म्हणाला, “माझे तुमच्यावर प्रेम आहे.”पण तुम्ही म्हणालात, “कशावरुन तू आमच्यावर प्रेम करतोस?”परमेश्वर म्हणाला, “एसाव याकोबचा भाऊ होता. बरोबर? पण मी याकोबला निवडले.

Interlinear

Choose Theme