Cross references
तो सेवक नगराबाहेरच्या विहिरीजवळ गेला संध्याकाळी पाणी नेण्यासाठी बायका तेथे येत असत. त्याने उटांना विसावा घेण्यासाठी तेथे बसवले.
पाहा, मी येथे या विहिरीजवळ उभा राहतो; येथे पाणी भरण्यास येणाऱ्या तरुण मुलीची वाट पाहतो; ती आल्यावर मी तिला विचारीन, “मुली, कृपा करुन तुझ्या घागरीतून मला थोडे पाणी पाज!”
याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.)
मिद्यानात एक याजक होता. त्याला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या शेरडामेंढरास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या डोणीत पाणी भरण्याचा प्रयत्न करीत होत्या;
गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.
तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील.
तव्हा पाणी नेण्यासाठी एक शोमरोनीस्त्री त्या विहीरीवर आली. येशू तिला म्हणाला. “मला प्यावयास पाणी दे.’