Home Bibles निर्गम 2:16 · मराठी बायबल
निर्गम 2:16 · मराठी बायबल

मिद्यानात एक याजक होता. त्याला सात मुली होत्या; आपल्या बापाच्या शेरडामेंढरास पाणी पाजण्यासाठी त्या विहिरीवर आल्या. त्या डोणीत पाणी भरण्याचा प्रयत्न करीत होत्या;

Cross references

उत्पत्ति 14:18

आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला.

उत्पत्ति 24:11

तो सेवक नगराबाहेरच्या विहिरीजवळ गेला संध्याकाळी पाणी नेण्यासाठी बायका तेथे येत असत. त्याने उटांना विसावा घेण्यासाठी तेथे बसवले.

उत्पत्ति 24:14

मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.”

उत्पत्ति 29:6

याकोबाने त्यांना विचारले, “तो बरा आहे काय?”त्यानी उत्तर दिले, “तो बरा व खुशाल आहे आणि त्याचे सर्वकाही चांगले आहे. ती पाहा त्याची मुलगी राहेल, त्याची मेंढरे घेऊन इकडे येत आहे.”

उत्पत्ति 29:9

याकोब मेंढपाळांशी बोलत असतानाच राहेल आपल्या बापाची मेंढरे घेऊन आली; (कारण शेरडा मेंढराना चारण्याचे व त्यांची निगा राखण्याचे काम ती करीत असे.)

उत्पत्ति 41:45

फारोने योसेफाला सापनाथ-पानेह असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पेटीफरा याची मुलगी आसनथ ही योसेफाला बायको करुन दिली. अशा रीतीने योसेफ सर्व मिसर देशावर प्रशासक झाला.

निर्गम 3:1

मोशेच्या सासऱ्याचे नाव इथ्रो असे होते. मोशे त्याची शेरडेमेंढरे चारणारा मेंढपाळ होता. एके दिवशी मोशे वाळवंटाच्या पश्चिमेला होरेब डोंगर म्हणजे सिनाय डोंगर ह्या देवाच्या डोंगराकडे आपली मेंढरे घेऊन गेला.

निर्गम 18:1

मोशेचा सासरा इथ्रो, मिद्यानाचा याजक होता. मोशे व इस्राएल लोक यांना देवाने अनेक मार्गानी मदत केली तसेच त्यांना त्याने मिसर देशातून सोडवून बाहेर आणले यासंबंधी इथ्रोने ऐकले;

Interlinear

Choose Theme