कारण अब्राहामाने स्वत: मला सांगितले की, ‘ही स्त्री माझी बहीण आहे,’ आणि त्या स्त्रीने ही सांगितले की, ‘हा माझा भाऊ आहे,’ तेव्हा मी निरपराधी आहे; मी काय करीत होतो हे मला कळले नाही.”
Cross references
“परमेश्वर हाच आमचा देव आहे.परमेश्वर हाच आमचा समर्य परमेश्वर आहे. आणि आम्ही हे का केले हे देवाला माहीत आहे. तुम्हीही समजून ध्या. आम्ही केले ते उचितच आहे हे तुमच्या लक्षात येईल. आम्ही चुकलो अशी तुमची खात्री पटली तर आम्हाला जिवंत ठेवू नका.
तुझे वडील दावीद यांच्या प्रमाणेच तू तुझी वर्तणूक ठेव. ते न्यायी आणि प्रामाणिक होते. तूही माझ्या आज्ञा पाळ, मी सांगितलेले सर्व करत राहा.
“परमेश्वर, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.
हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.
तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही. मी अपराधी नाही.
परमेश्वरा, माझा निवाडा कर. मी बरोबर आहे हे सिध्द कर मी निरपराध आहे हे सिध्द कर.
वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.
तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
देवा तू खरोखरच चांगला आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तू माझे रक्षण कर.
परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
मग मी माझेच मन शुध्द का करु? मी माझे हात स्वच्छ का करु.
आणि दावीदने त्यांना शुध्द मनाने मार्ग दाखवला, त्याने त्याना शहाणपणाने मार्ग दाखवला.
चांगल्या, इमानदार लोकांना प्रामाणिकपणा मार्गदर्शन करतो. पण दुष्ट लोक जेव्हा दुसऱ्यांना फसवतात तेव्हा ते स्वत:चाच नाश करुन घेतात.
चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही.
कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.
तुम्ही साक्षी आहात आणि देवसुद्धा साक्षी आहे की, आम्ही किती धार्मिकतेने, न्यायाने आणि निर्दोष रीतीने तुम्हा विश्वासणाऱ्यांंबरोबर वागलो.
जरी मी पूर्वी निंदा करणारा, मनस्ताप देणारा आणि हिंसक होतो, तरी माझ्यावर दया दाखविण्यात आली. तोर्पांत मी विश्वासणारा नव्हतो म्हणून अज्ञानामुळे मी तसा वागलो.