मग मी माझेच मन शुध्द का करु? मी माझे हात स्वच्छ का करु.
Cross references
“मी जरी म्हणालो, ‘की मी तक्रार करणार नाही, माझे दु:ख विसरेन, मी चेहऱ्यावर हास्य आणेन.
मी आधीच अपराधी ठरवला गेलो आहे. मग प्रयत्न तरी कशाला करायचे? मी म्हणतो, ‘विसरुन जा सारे!’
तरीही देव मला घाणीच्या खड्ड्यात ढकलेल. नंतर माझे स्वत:चे कपडे देखील माझा तिरस्कार करतील.
आणि दुष्ट लोक म्हणतात, ‘सर्वशक्तिमान देव कोण आहे? आम्हाला त्याची चाकरी करण्याची गरज नाही. त्याची प्रार्थना करण्यात काही अर्थ नाही.’
मी असे का म्हणतो? कारण ईयोब म्हणतो की, ‘माणूस जर देवाला खुश करायला लागला तर त्याला त्यापासून काहीही मिळणार नाही.’
आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
तिथे कोण उपासना करु शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्ये केली नाहीत, ज्यांचे ह्दय शुध्द आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत असेच लोक तिथे आराधना करु शकतील.
परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.
देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
तुम्ही म्हणालात “परमेश्वराची उपासना करणे व्यर्थ आहे. आम्ही परमेश्वराने सांगितल्याप्रामाणे केले. पण आमचा काहीच फायदा झाला नाही. लोक प्रेतक्रियेच्या वेळी जसे रडतात, तसे आम्ही पाप केले म्हणून शोक केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
म्हणून बंधु आणि भगिनींनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण बिनधास्तपणे परमपवित्र स्थानामध्ये प्रवेश करतो.
देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.