Home Bibles उत्पत्ति 19:31 · मराठी बायबल
उत्पत्ति 19:31 · मराठी बायबल

एके दिवशी वडील मुलगी धाकटीला म्हणाली, “पृथ्वीवर जिकडे तिकडे स्री पुरुष लग्न करुन राहतात, आपले वडील म्हातारे होत राहिले आहेत; आणि या भागात आपल्याबरोबर लग्न करण्यास एकही पुरुष नाही;

Cross references

उत्पत्ति 4:1

आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले.तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे.”

उत्पत्ति 6:4

नंतर परमेश्वर म्हणाला, “मनुष्य हा देहधारी आहे, तो भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची सत्ता त्यांच्या ठायी सर्वकाळ राहणार नाही; म्हणून मी माझ्या आत्म्याला त्याच्यापासून सतत - त्रास होऊ देणार नाही; तर मी त्यांस एकशेंवीस वर्षांचेच आयुष्य देईन.”

उत्पत्ति 16:2

साराय अब्रामाला म्हणाली, “परमेश्वराने मला मुले होण्यापासून रोखले आहे तेव्हा तुम्ही माझ्या दासीपाशी जा, तिच्यापोटी जन्मलेले मूल माझेच मूल आहे असे समजून मी ते स्वीकारीन.”अब्रामाने आपली बायको साराय हिचे म्हणणे मान्य केले.

उत्पत्ति 16:4

हागार अब्रामापासून गरोदर राहिली; आपण गरोदर आहो हे पाहून आपण आपली मालकीण साराय हिच्यापेक्षा अधिक चांगल्या आहो असे हागारेला वाटू लागले व तिला गर्व झाला;

उत्पत्ति 19:28

त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.

उत्पत्ति 38:8

मग यहूदा, एर याचा भाऊ ओनान याला, म्हणाला, “तू जाऊन तुझ्या मरण पावलेल्या भावाच्या बायकोपाशी नीज; आणि तू तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वाग जर तुझ्यापासून तिला मुले झाली तर ती तुझ्या भावाची मुले समजली जातील व त्याचा वंश पुढे चालवितील:”

उत्पत्ति 38:14

तामार नेहमीच आपल्या विधवादशेतील वस्त्रे घालीत असे; तेव्हा तिने आता वेगळी वस्त्रे घातली आणि बुरखा घेऊन आपले तोंड झाकले. नंतर तिम्ना जवळच्या एनाईम गांवाला जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ ती बसून राहिली. यहूदाचा मुलगा शेला आता लग्न करण्याच्या वयाचा झाला आहे हे तामारला माहीत होते; परंतु त्याच्याशी तिचे लग्न लावून देण्याविषयी यहूदा काहीच योजना करीत नव्हता.

अनुवाद 25:5

“दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.

यशया 4:1

त्यावेळी सात स्त्रिया एका माणसाला पकडून म्हणतील, “आम्ही आमचे अन्न व वस्त्र स्वत: मिळवू. फक्त तू आमच्याशी लग्न कर. तुझे नाव आम्हाला लावू दे. कृपया आमच्या अब्रूचे रक्षण कर.”

मार्क 9:6

पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्याला समजेना कारण ते भयभीत झाले होते.

Interlinear

Choose Theme