मग यहूदा, एर याचा भाऊ ओनान याला, म्हणाला, “तू जाऊन तुझ्या मरण पावलेल्या भावाच्या बायकोपाशी नीज; आणि तू तिचा नवरा असल्याप्रमाणे तिच्याशी वाग जर तुझ्यापासून तिला मुले झाली तर ती तुझ्या भावाची मुले समजली जातील व त्याचा वंश पुढे चालवितील:”
Cross references
“तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल.
आणि जर एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून जमीन मिळाली तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल.
“दोन भाऊ एकत्र राहात असले आणि त्यातला एक मूलबाळ व्हायच्या आधीच वारला तर त्याच्या बायकोने कुटुंबाबाहेरच्या कोणा परपुरुषाशी लग्न करु नये. दिरानेच तिच्याशी लग्न करावे व दिराचे कर्तव्य बजावावे.
यानंतर तिला जो पहिला मुलगा होईल त्याने तिच्या मृत पतीचे नाव पुढे चालवावे. म्हणजे त्याचे नाव इस्राएलमधून नामशेष होणार नाही.
पण नामी त्यांना म्हणाली,” नाही मुलींनो तुम्ही आपापल्या घरी जा. माझ्याबरोबर येऊन तरी काय फायदा? मी ही अशी. माझ्या पोटी आणखी मुलगे नाहीत.नाहीतर तुम्ही त्यांच्याशी लग्न केले असते.
पूढे बवाज म्हणाला, “नामीची जमीन घेतलीस तर मवाबहून आलेली विधवा रूथसुद्धा तुझी पत्नी होईल. तिला मुल झाले की जमीन त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे जमीनीचा ताबा तिच्या मृत पतीच्याच कुटुंबात राहील.”
यावर तो आप्त म्हणाला, “मी काही ती जमीन घेत नाही. मीच खरे तर ती घ्यायला हवी, पण मला ते शक्य नाही कारण त्यामुळे कदाचित् मी माझ्या स्वत:च्या जमिनीला मुकेन.तेव्हा तू ती खुशाल घेऊ शकतोस.”
त्याच दिवशी काही सदूकी लोक त्याच्याकडे आले (हे लोक असे समजातात की पुनरूत्थान नाही) त्यांनी येशूला एक प्रश्न विचारला,