Home Bibles ☰ Books उत्पत्ति 14:24 · मराठी बायबल
उत्पत्ति 14:24 · मराठी बायबल

माझ्या या तरुण माणसांनी जे अन्न खाल्ले आहे तेवढ्याचाच मी स्वीकार करतो; परंतु इतर लोकांना लढाईतून मिळालेल्यापैकी त्यांचा वाटा घेऊ दे, आणि त्यातून काही आनेर, अष्कोल व मम्रे यांस दे, कारण त्यांनी लढाईत मला खूप मदत केली.”

Cross references

उत्पत्ति 14:13

या लढाईत पकडला न गेलेला एक मनुष्य अब्राम इब्रीकडे पळून गेला व त्याने त्याला हे वर्तमान सांगितले त्यावेळी अब्राम मम्रे अमोरी वृक्षांजवळ तळ देऊन राहिला होता; मम्रे, अष्कोल व आनेर ह्यांनी एकमेकांना व अब्रामाला मदत करण्याचा करार केला.

नीतिसूत्रे 3:27

जेव्हा शक्य होईल तेव्हा ज्यांना मदतीची गरज असते त्यांच्यासाठी चांगली गोष्ट करा.

मत्तय 7:12

“यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हांला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टेयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.(लूक 13:24)

रोमकरांस 13:7

तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.

1 करिंथकरांस 9:14

त्याचप्रकारे, प्रभूने आज्ञा केली आहे की, जे सुवार्ता गाजवितात त्यांनी त्या सुवार्ता गाजविण्याकडून आपला चरितार्थ चालवावा.

1 तीमथ्याला 5:18

कारण पवित्र शास्त्र म्हणने, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको.”आणि मजुरचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”

Interlinear

Choose Theme