मी तुझे असलेले काहीही ठेवणार नाहीं, एखादे सूत वा जोड्याचा बंधही ठेवणार नाही ‘मी अब्रामाला श्रीमंत केले’ असे तू म्हणावे असे मला वाटत नाही.
Cross references
पण हा संदेष्ट्या म्हणाला, “अर्धे राज्य मला देऊ केलेस तरी मी तुझ्याबरोबर घरी येणार नाही. इथे मी अन्नपाणी घेणार नाही.
पण अलीशा त्यांना म्हणाला, “मी परमेश्वराचा सेवक आहे आणि त्याची शपथ घेऊन सांगतो, मी कोणतीही भेट वगैरे घेणार नाही.”आपल्या भेटीचा स्वीकार करावा म्हणून नामानने अलीशाला परोपरीने विनवले पण अलीशाचा नकारच होता.
अलीशाचा नोकर गेहजी याला वाटले, “पाहा, माझ्या धन्याने या अरामच्या नामानला तसेच, त्याच्या कडून भेट न स्वीकारता जाऊ दिले. मीच आता धावत जाऊन त्याला गाठतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतो.”
अदार महिन्याच्या चौदाव्या दिवशी शूशनमधील यहुदी एकत्र जमले. त्यांनी शूशनमधल्या 300 जणांना जिवे मारले पण त्यांच्या संपत्तीची लूट केली नाही.
आणि मी तुम्हांजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही. कारण मासेदिनियाहून जे बंधु आले त्यांनी माझी गरज पुरविली. आणि सर्व गोष्टीत मी तुम्हांस ओझे होऊ नये म्हणून मी स्वत:स ठेवले आणि यापुढेही ठेवीन.
पाहा, आता तिसन्यांदा तुम्हाकडे येण्यासाठी मी तयार आहे. आणि मी तुम्हांला भार होणार नाही. कारण मी तुमची संपत्ती मिळवायला येणार नाही. तर तुम्हांला मिळवण्यासाठी येणार आहे. शेवटी मुलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी बचत करायची नसते तर आईवडिलांनी मुलांसाठी बचत करायची असते.
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे.“मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही” अनुवाद 31:6