Home Bibles उत्पत्ति 10:22 · मराठी बायबल
उत्पत्ति 10:22 · मराठी बायबल

शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;

Cross references

उत्पत्ति 9:26

नोहा आणखी म्हणाला, “शेमचा परमेश्वर देव धन्यवादित असो! कनान शेमचा गुलाम होवो.

उत्पत्ति 14:1

शिनाराचा राजा अम्रफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचाराजा कदार्लागोमर आणि गोयीमाचा राजा तिदाल,

गणना 23:7

नंतर बलामने हे सांगितले:पूर्वेकडच्या अराम पर्वतावरुन मवाबचा राजा बालाक याने मला येथे आणले. बालाक मला म्हणाला, “ये, माझ्यासाठी याकोब विरुद्ध बोल. ये इस्राएल लोकांविरुद्ध बोल.”

2 राजे 15:19

अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.

1 इतिहास 1:17

एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद आणि अराम हे शेमचे मुलगे, ऊस, हूल, गेतेर आणि मेशेख हे अरामचे मुलगे.

ईयोब 1:17

दुसरा निरोप्या हे सांगत असतानाच आणखी एक निरोप्या आला. तिसरा निरोप्या म्हणाला, “खास्द्यांनी तीन टोळ्या आपल्यावर हल्ला करण्यासाठी पाठवल्या. त्यांनी हल्ला करुन उंट पळवून नेले आणि नोकरांना मारुन टाकले. फक्त मीच त्यातून सुटून तुला सांगायला आलो आहे.”

यशया 11:11

त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.

यशया 21:2

काहीतरी भयंकर घडणार असल्याचा दृष्टान्त मला होत आहे. विश्वासघातकी तुझ्याविरूध्द जाताना मला दिसत आहे. लोक तुझी संपत्ती लुटून नेताना मी पाहतोय, एलाम, जा आणि लोकांवर चढाई कर. मादया, शहराला वेढा घाल आणि त्याचा पाडाव कर. त्या शहरातील सर्व दुष्कृत्ये मी नाहीशी करीन.

यशया 22:6

एलामचे घोडदळ भाते अडकवून लढाईसाठी दौड करील. कीरवासीयांच्या ढालींचा खणखणाट होईल.

यशया 66:19

काही लोकांवर मी खूण करीन. मी त्यांना वाचवीन. मी ह्या वाचविलेल्या काही लोकांना तार्शीश, पूल, लूद (धनुर्धाऱ्यांचा देश), तूबल, यवान आणि दूरूदरच्या देशांत पाठवीन. त्या लोकांनी कधीच माझी शिकवण ऐकलेली नाही. त्यांनी कधीच माझे तेज पाहिलेले नाही म्हणून वाचविले गेलेले लोक, त्या राष्ट्रांना माझ्या तेजाबद्दल सांगतील.

यिर्मया 25:25

जिमरी, एलाम व मेदी येथील सर्व राजांना मी द्राक्षरस पाजला.

यिर्मया 49:34

यहूदाचा राजा सिद्कीया ह्याचा कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात यिर्मया या संदेष्ट्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो एलाम या राष्ट्राबाबत होता.

प्रेषितांचीं कृत्यें 2:9

पार्थी, मेदी, एलाम, मेसोपोटेमिया, यहूदा, कपदुकीया, पंत, आशिया

Interlinear

Choose Theme