Home Bibles उत्पत्ति 21:1 · मराठी बायबल
उत्पत्ति 21:1 · मराठी बायबल

परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले.

Cross references

उत्पत्ति 17:16

मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.”

उत्पत्ति 17:19

देव म्हणाला, “नाही, मी सांगितले की तुझी बायको सारा हिला मुलगा होईल; त्याचे नाव तू इसहाक ठेव; मी त्याच्याशी करार करीन; तो करार त्याच्या वंशजांसाठी चिरंनतर असेल.

उत्पत्ति 17:21

पण मी इसहाका बरोबर माझा करार करीन, साराला मुलगा होईल तो इसहाक असेल; तो मुलगा पुढल्या वर्षी याचवेळी जन्मेल.”

उत्पत्ति 18:10

मग परमेश्वर म्हणाला, “मी पुढल्या वसंत ऋ तूत येईन त्या वेळी तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”सारा तंबूच्या तोंडाशी उभी राहून कान देत होती म्हणून या गोष्टी तिने ऐकल्या.

उत्पत्ति 18:14

परमेश्वराला काही अशक्य आहे का? येत्या वसंतऋ तूत सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येईन तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.”

उत्पत्ति 50:24

योसेफाचे मरण जवळ आले तेव्हा तो आपल्या भावांना म्हणाला, “माझी मरण्याची वेळ जवळ आली आहे; परंतु देव तुमची काळजी घेईल हे मला माहीत आहे. तो देव तुम्हाला ह्या देशातून काढून अब्राहाम, इसहाक, व याकोब यांना जो देश देण्याचे वचन त्याने दिले होते त्या देशात घेऊन जाईल.”

निर्गम 3:16

आणखी परमेश्वर म्हणाला, “तू जाऊन इस्राएल लोकांच्या वडीलधाऱ्यांना (पुढाऱ्यांना) एकत्र बोलव आणि त्यांना सांग की तुमच्या पूर्वजांचा देव म्हणजे अब्राहाम, इसाहाक व याकोब यांचा देव ‘याव्हे’ मला दर्शन देऊन माझ्याशी बोलला आहे. परमेश्वर म्हणतो मी तुमच्याविषयी विचार केला आहे.

निर्गम 4:31

तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्याना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली.

निर्गम 20:5

त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;

रूथ 1:6

यहूदात आता दुष्काळ राहिलेला नाही परमेश्वर आपल्या लोकांच्या मदतीला धावून आला आहे, आणि त्याने त्यांना अन्न पुरवलेले आहे असे मवाबात नामीच्या कानालर आले. तेव्हा तिने घरी परत जायचे ठरवले तिच्या सुनाही तिच्याबरोबर जायला तयार झल्या.

1 शमुवेल 2:21

परमेश्वराने हन्नावर कृपा केली आणि तिला नंतर तीन मुलगे आणि दोन मुली झाल्या. शमुवेल परमेश्वराच्या पवित्र सान्निध्यात वाढत होता.

2 राजे 4:17

या बाईला दिवस राहिले. अलीशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला.

स्तोत्रसंहिता 12:6

परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत.

स्तोत्रसंहिता 106:4

परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव. मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.

मत्तय 24:35

सर्व जग, आकाश, पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.

लूक 1:68

प्रभु, इस्राएलाचा देव धन्यवादित असो, कारण तो त्याच्या लोकांना मदत करण्यास, व त्यांना मुक्त करण्यास आला आहे.

लूक 19:44

ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील. व दगडावर दगड राहू देणार नाही. कारण देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”

रोमकरांस 4:17

पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे: “मी तुला पुष्कळ राष्टांचा पिता केले आहे.”आब्राहामाचा देव जो मेलेल्यांना जीवन देतो, जे अस्तित्वात नाही त्यांना अस्तित्वात आणतो त्या देवासमोर हे खरे आहे.

गलतीकरांस 4:23

देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

गलतीकरांस 4:28

बंधूनो, आता तुम्ही इसहाकासारखी देवाच्या वचनाचा परिणाम म्हणून जन्मलेली मुले आहात, परंतु तो त्यावेळीजसा देहस्वभावाप्रमाणे जन्मला होता व त्याने आत्म्याच्या सामर्थ्याने जन्मलेल्यांचा छळ केला तसे आता आहे.

तीताला 1:2

तो विश्वास आणि ते ज्ञान अनंतकाळच्या जीवनाच्या आमच्या आशेमुळे येते. काळाची सुरुवात होण्यापूर्वी देवाने त्या जीवनाचे अभिवचन आम्हांला दिले. आणि देव खोटे बोलत नाही.

Interlinear

Choose Theme