2 करिंथकरांस 8:20 · मराठी बायबल
ही जी विपुलता आम्हांकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हांवर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत.
Cross references
मत्तय 10:16
“लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हांस पाठवीत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे सरळ स्वभावी असा.
रोमकरांस 14:16
म्हणून तुम्हांसाठी जे चांगले आहे त्याची निंदा होऊ नये.
1 करिंथकरांस 16:3
मी येईन तेव्हा ज्या माणसांना तुम्ही मान्यता द्याल त्यांना मी ओळखपत्रे देऊन तुमच्या देणग्या यरुशलेमला नेण्यासाठी पाठवीन.
2 करिंथकरांस 11:12
आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे आमच्याबरोबर समानता साधण्याची संधी शोधत आहेत. ज्या गोष्टीविषयी ते अभिमान बाळगतात, त्यांना मी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल असे करीन.
इफिसकरांस 5:15
म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
1 थेस्सलनीकाकरांस 5:22
दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.