करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.
Cross references
मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो.
पण इस्रएलच्या देवाची प्रभाही तेथे होती. खबार कालव्याजवळ मला झालेल्या दृष्टान्तातील प्रभेप्रमाणेच ही प्रभा होती.
मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले.
ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.
पूर्वेकडून तेथे इस्राएलच्या देवाची प्रभा फाकली. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे देवाचा आवाज प्रचंड होता. त्याच्या प्रभेने भूमी उजळली होती.