Home Bibles यहेज्केल 11:22 · मराठी बायबल
यहेज्केल 11:22 · मराठी बायबल

ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.

Cross references

यहेज्केल 1:19

चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात.

यहेज्केल 9:3

करुब दूतांवर असणारी देवाची प्रभा फाकली आणि मंदिराच्या दारापर्यंत गेली. उंबरठ्यावर ती थांबली. मग तिने तागाचे कपडे घातलेल्या व लेखणी व दौत जवळ असलेल्या माणसाला हाक मारली.

यहेज्केल 10:19

मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.

Interlinear

Choose Theme