“जेव्हा राजा स्वसंतोष अर्पण परमेश्वरासाठी करील (कदाचित् ते होमार्पण असेल वा कदाचित् शांत्यर्पण असेल किंवा स्वसंतोषदर्शक असेल.) तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडले जाईल. मग शब्बाथच्या दिवसाप्रमाणे तो अर्पण करील. तो जाताच, दार लावून घेण्यात येईल.
Cross references
“जेव्हा एखाद्या माणसाला गुरांढोरांतले होमार्पण अर्पावयाचे असेल तेव्हा त्याने दोष नसलेला नर अर्पावा; तो त्याने दर्शनमंडपाच्या दारापाशी आणून अर्पावा म्हणजे परमेश्वर ते अर्पण मान्य करील.
“यज्ञबलीचे अर्पण स्वखुशीचे किंवा नवसाचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्या दिवशी त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरले तर ते त्याने दुसऱ्या दिवशी खावे.
परमेश्वराच्या नेहमीच्या शब्बाथ पालना शिवाय अधिक म्हणून हे सणाचे दिवस तुम्ही साजरे करावेत; तुमची सणाची अर्पणे ही तुमची नवस फेडीची अर्पणे, तुम्ही परमेश्वराला अर्पावयाच्या भेटी व इतर अर्पणे, ह्यांच्यात भर घालणारी अर्पणे असावीत.
“या खास सुट्टीत तुम्ही होमार्पण व पेयार्पण ही नवस व शांत्यर्पणाची अर्पणे म्हणून आणली पाहिजेत. ही सर्व अर्पणे तुम्ही परमेश्वराला करावीत. ही सर्व अर्पणे तुम्हाला परमेश्वराला खास भेट द्यायची असेल किंवा परमेश्वराला काही खास वचन दिले आहे म्हणून द्यावयाच्या अर्पणाव्यतिरिक्त असतील.”
गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन एकदा यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
दुसऱ्या दिवशी लोकांनी परमेश्वराला यज्ञ अर्पण केले. त्यांनी होमार्पणे वाहिली. 1,000 गोऱ्हे, 1000 एडके, 1,000 कोकरे आणि त्याबरोबर पेयार्पणे त्यांनी अर्पण केली. शिवाय सर्व इस्राएलींसाठी त्यांनी आणखीही पुष्कळ यज्ञ केले.
राजा शलमोन आणि इस्राएलाचे लोक करारकोशाला सामोरे गेले. कोशासमोर त्यांनी मेंढरांचे आणि गुराढोरांचे बळी अर्पण केले. मोजदाद करता येऊ नये इतके प्राणी त्यांनी बळी दिले.
राजा शलमोनाने 22,000 बैल आणि 1,20,000 मेंढरे वाहिली. राजा आणि प्रजा यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना केली. ते फक्त उपासनेसाठी वापरायचे होते.
हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी होमार्पणेही आणली.
आणि इस्राएलांपैकी जे कोणी शत्रूच्या तावडीतून बचावले असतील त्यांना ते असतील त्या ठिकाणच्या लोकांनी साहाय्य करावे. त्यांना चांदी, सोने, गायी-गुरे इत्यादी गोष्टी द्याव्यात. यरुशलेममधील मंदिरासाठी स्वखुशीने दाने द्यावीत.”
त्यांनंतर नित्याचे होमार्पण, नवचंद्रदिनी करायचे होमार्पण आणि परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे सणांचे आणइ दिवसांचे बळी द्यायला त्यांनी सुरुवात केली. याखेरीज लोकांनी परमेश्वराला स्वेच्छेनेही अनेक गोष्टी अर्पण केल्या.
प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलींच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते.