Home Bibles यहेज्केल 40:4 · मराठी बायबल
यहेज्केल 40:4 · मराठी बायबल

तो माणूस मला म्हणाला, “मानवपुत्रा, तुझ्या डोळ्यांचा व कानांचा उपयोग कर. ह्या गोष्टी पाहा आणि माझे म्हणणे ऐक. मी दाखवीत असलेली प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाहा. का? कारण ह्या गोष्टी मी तुला दाखविण्यासाठीच तुला येथे आणले आहे. येथे पाहिलेले सर्व काही तू इस्राएलच्या लोकांना सांगितले पाहिजेस.”

Cross references

यशया 21:10

0यशया म्हणाला, “माझ्या लोकांनो, सर्वशक्तिमान परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने जे मला ऐकवले, ते मी तुम्हाला सांगितले. खळ्यातील धान्याप्रमाणे तुम्ही झोडपले जाल.”

यिर्मया 26:2

परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा संदेश दे. मी तुला सांगितलेले सर्व यहूदातील सगळ्या लोकांना सांग. माझ्या संदेशातील कोणताही भाग गाळू नकोस.

यहेज्केल 2:1

तो आवाज म्हणाला, “मानवपुत्रा उठ मी तुझ्याशी बोलणार आहे.”

यहेज्केल 2:7

मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.

यहेज्केल 3:17

“मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे.

यहेज्केल 43:10

“आता, मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना मंदिराबद्दल सांग. मंदिराच्या योजनेबद्दल त्यांना कळेल. तेव्हा त्यांना त्यांच्या पापाची लाज वाटेल.

यहेज्केल 44:5

परमेश्वरा मला म्हणाला, “मानवपुत्रा, अगदी लक्षपूर्वक पाहा! तुझ्या डोळ्यांचा आणि कानांचा वापर कर. ह्या गोष्टी पाहा आणि परमेश्वराच्या मंदिराच्या विधिनियमाबाबत मी जे सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. मंदिराचे प्रवेश-मार्ग व पवित्र जागेचे बाहेर जाण्याचे मार्ग काळजीपूर्वक पाहा.

मत्तय 10:27

जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.

मत्तय 13:9

ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.

मत्तय 13:51

येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?” तेव्हा ते म्हणाले, “होय.”

प्रेषितांचीं कृत्यें 20:27

देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.

1 करिंथकरांस 11:23

कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली.

Interlinear

Choose Theme