Home Bibles मत्तय 10:27 · मराठी बायबल
मत्तय 10:27 · मराठी बायबल

जे मी तुम्हांला अंधारात सांगतो ते तुम्ही प्रकाशात बोला, आणि कानात सांगितलेले जे तुम्ही ऐकता ते तुम्ही छपरावरून गाजवा.

Cross references

नीतिसूत्रे 1:20

ऐक! ज्ञान (रुपी स्त्री) लोकांना शिकवायचा प्रयत्न करीत आहे. ती रस्त्यात आणि बाजारात ओरडत आहे.

नीतिसूत्रे 8:1

ऐक, ज्ञान आणि समजूतदारपणा तुला तू एकावेस म्हणून तुला बोलावत आहेत.

मत्तय 13:1

त्याच दिवशी येशू घराबाहेर पडून सरोवराच्या काठी जाऊन बसला.

मत्तय 13:34

लोकांना बोध करण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला.

लूक 8:10

म्हणून तो म्हणाला, “तुम्हांला देवाच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. पण इतरांच्यासाठी ते बोधकथेमध्ये दिले आहे.“यासाठी की, जरी ते पाहत असले, तरी त्यांना दिसू नये आणि ऐकत असले तरी त्यांना समजू नये.’ यशया 6:9

योहान 16:1

मी हे सर्व तुम्हांला सांगितले आहे ते यासाठी की, तुम्ही माझ्यावरील विश्वासविषयी भुलविले जाऊ नये.

योहान 16:13

पण जेव्हा तो सत्याचा आत्मा येतो, तेव्हा तो तुम्हांला सर्व सत्यात मार्गदर्शन करील, तो त्याचे स्वत:चे असे काही बोलणार नाही, तो जे ऐकतो तेच तो बोलेल, आणि जे अजून यावयाचे आहे, त्याविषयी तो तुम्हांला सांगेल.

योहान 16:25

“जरी मी तुम्हांला रूपकाच्या भाषेत या गोष्टी सांगितल्या आहेत, तरी मी आणखी अशा प्रकारची भाषा बोलणार नाही, पण साधेपणाने पित्याविषयी तुम्हांला सांगेन.

योहान 16:29

मग येशूचे शिष्य म्हणाले, “आता तुम्ही स्पष्टपणे बोलत आहात आणि रूपकाची भाषा वापरीत नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 5:20

“जा आणि मंदिरात उभे राहा. येशू रिव्रस्तामधील जे नवीन जीवन आहे त्याविषयी लोकांना सांगा.”

प्रेषितांचीं कृत्यें 5:28

तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”

प्रेषितांचीं कृत्यें 17:17

सभास्थानामध्ये पौल जे खऱ्या देवाची उपासना करीत अशा यहूदी व ग्रीक लोकांशी बोलला. शहराच्या व्यापार क्षेत्रातील काही लोकांशीही पौल बोलला. पौल दररोज लोकांशी बोलत असे.

2 करिंथकरांस 3:12

म्हणून आम्हांला अशी आशा असल्यामुळे, आम्ही फार धीट आहोत.

Interlinear

Choose Theme