मग त्या माणसाने मला दक्षिणेकडे नेले. तेथे मला एक दार दिसले. त्या माणसाने त्या दाराच्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप ह्यांचे मोजमाप घेतले. ते इतर दारांच्या खांबांप्रमाणे व द्वारमंडपांप्रमाणेच भरले.
Cross references
मग तो माणूस पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक पट्टी (10 फूट 6 इंच) रुंद होता. दुसरा उंबराही तेवढाच रुंद होता.
बाहेरच्या पटांगणाच्या उत्तरेकडे तोंड असलेल्या दाराची लांबी व रुंदीही त्या माणसाने मोजली.
मग त्या माणसाने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले. दक्षिणेकडचे दार इतर दारांच्याच मापाचे होते.
पूर्वेच्या दाराकडील खोल्या बाजूच्या भिंती व द्वारमंडप इतर दारांप्रमाणेच त्यांच्याच मापाचे होते. दाराच्या व द्वारमंडपाच्या सभोवताली खिडक्या होत्या. पूर्वेकडील दार 50 हात (87फूट 6 इंच) लांब व 25हात (43फूट 9 इंच) रुंद होते.
मग मला त्या माणसाने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती.
“खास सणांच्या वेळी देशातील लोक परमेश्वरापाशी येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. प्रत्येकाने सरळ दिशेनेच गेले पाहिजे.