त्यांना सांग, ‘मी (यहेज्केल) तुम्हा लोकांसाठी एक उदाहरण आहे. मी केलेल्या सर्व गोष्टी खरे, म्हणजे तुमच्याबाबतीत घडणार आहेत.’ तुम्हाला खरोखरच कैदी म्हणून दूरच्या देशांत जाणे भाग पडेल.
Cross references
त्यांनी सिद्कीयाच्या मुलांना त्याच्या नजरेसमोर जिवे मारले. नंतर सिद्कीयाचे डोळे काढले आणि त्याला जेरबंद करुन बाबेलला नेले.
नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.
आपल्या मालकीच्या सर्व चीजवस्तू घेऊन पळून जाण्याच्या तयारीत राहा. यहूदाच्या लोकांनो, शत्रूने तुमच्या शहराला वेढले असून तुम्ही आता अडकला आहात.
ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’
सेनापती नबूजरदानने यरुशलेममध्ये अजूनही राहत असलेल्यासर्व लोकांना कैदी म्हणून नेले. बाबेलच्या राजाला आधीच शरण आलेल्यांनाही तो घेऊन गेला. यरुशलेममध्ये मागे राहिलेले कुशल कारागीरही त्याने बरोबर नेले.
आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केलेनबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.
“मानवपुत्रा, एक वीट घे. त्यावर यरुशलेमचे चित्र कोर
एक लोखंडी कढई तुझ्या व नगरीच्या मध्ये ठेव. ही कढई म्हणजे तुला व नगरीला विभागणारी भिंतच होय, ह्या रीतीने तू त्या नगरीच्या विरुद्व आहेस हे दाखव. तू त्या नगरीला वेढा घालून हल्ला करशील. का? कारण हे इस्राएलच्या लोकांसाठी प्रतीक वा खूण असेल. ह्यावरुन मी (देव) यरुशलेमवर हल्ला करणार असल्याचे स्पष्ट होईल.
रात्री सामान पाठीवर टाकून चालू लाग. तू कोठे जात आहेस हे दिसू नये म्हणून तोंड झाकून घे. लोक पाहू शकतील अशाच तऱ्हेने तू या गोष्टी केल्या पाहिजेस. का? कारण मी तुझा उपयोग करुन (तुझ्याकडून) इस्राएलच्या लोकांपुढे एक उदाहरण घालून देत आहे.”
तेव्हा यहोशवा मुख्ययाजका, तू स्वत: व तुझ्या समोर बसलेल्या सहकारी याजकांनी ऐकले पाहिजे. माझा खास सेवक मी आणल्यावर काय घडणार आहे, ह्याची ही माणसे म्हणजे नमुने आहेत. त्याला कोंब म्हणतील.