Home Bibles यहेज्केल 33:8 · मराठी बायबल
यहेज्केल 33:8 · मराठी बायबल

मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल.

Cross references

उत्पत्ति 2:17

परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”

उत्पत्ति 3:4

परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही.

गणना 27:3

“आम्ही वाळवंटातून प्रवास करीत असताना आमचे वडील गेले. त्यांना नैसर्गिक मरण आले. ते कोरहाच्या समूहाला मिळण्यांपैकी नव्हते (कोरह हा परमेश्वराच्या विरुद्ध जाणाऱ्यापैकी होता.) पण आमच्या वडिलांना एकही मुलगा नव्हता.

नीतिसूत्रे 11:21

दुष्टांना खरोखरच शासन होईल. ही गोष्ट खरी आहे. आणि चांगल्या लोकांना सोडून देण्यात येईल.

उपदेशक 8:13

दुष्ट लोक देवाला मान देत नाहीत म्हणून त्यांना खरोखरच चांगल्या गोष्टी मिळणार नाहीत. त्या दुष्टांना भरपूर आयुष्य लाभणार नाही. त्यांचे आयुष्य सूर्य अस्ताला जाताना लांब लांब होणाऱ्या सावल्यांसारखे नसेल.

यशया 3:11

पण दुर्जनांची काही धडगत नाही. त्यांना खूप त्रास होईल. त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना सजा मिळेल.

यिर्मया 8:11

माझे लोक अतिशय वाईट रीतीने दुखावले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात पण ते तर त्या जखमांवर, किरकोळ खरचटल्यावर करतात, त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे. ठीक आहेत.’ पण हे ठीक नाही.

यिर्मया 14:13

पण मी परमेश्वराला म्हणालो, “परमेश्वरा, माझ्या प्रभू, संदेष्टे तर लोकांना काही वेगळेच सांगत होते. ते लोकांना सांगत होते, ‘शत्रू कधीच तुमच्यावर हल्ला करणार नाही. तुमची कधीही उपासमार होणार नाही. परमेश्वर तुमच्या देशात शांती राखेल.”

यहेज्केल 13:9

परमेश्वर म्हणतो, “खोटे दृष्टान्त पाहणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन. माझ्या लोकांतून मी त्यांना बाजूला काढीन. इस्राएलच्या वंशजांच्या नामावळीत त्यांची नावे असणार नाहीत. ते इस्राएलच्या भूमीत परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.

यहेज्केल 18:4

मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.

यहेज्केल 18:10

“पण त्या सज्जनाचा मुलगा कदाचित् ह्या सर्व चांगल्या गोष्टी करणार नाही. तो मुलगा कदाचित् चोरी करीत असेल व लोकांना ठार मारीत असेल.

यहेज्केल 18:18

वडील कदाचित लोकांना दुखवीत असतील आणि चोरी करीत असतील. ते त्यांच्या माणसांकरिता काहीच भल्या गोष्टी करीत नसतील ते त्यांच्या पापांनी मरतील. पण वडिलांच्या पापाबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही.

यहेज्केल 18:20

पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

यहेज्केल 33:6

“पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’

यहेज्केल 33:14

“किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल.

प्रेषितांचीं कृत्यें 20:26

म्हणून मी तुम्हांला जाहीरपणे सांगतो की, सर्वांच्या रक्तासंबंधाने मी निर्दोष असा आहे.

Interlinear

Choose Theme