Home Bibles यहेज्केल 18:20 · मराठी बायबल
यहेज्केल 18:20 · मराठी बायबल

पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

Cross references

निर्गम 32:33

परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “जे मजविरुद्ध पाप करतात केवळ त्या लोकांचीच नांवे मी माझ्या पुस्तकातून काढून टाकतो.

लेवीय 5:1

“एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

लेवीय 5:17

“परमेश्वराने मना केलेली एखादी गोष्ट करुन कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.

लेवीय 10:17

“तुम्ही पापार्पणाच्या बलीचे मांस पवित्रस्थानी खावयास पाहिजे होते; कारण ते परमपवित्र आहे! तुम्ही ते परमेश्वरासमोर का खाल्ले नाही? मडळीचा अन्याय वाहून त्यांच्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित करावे म्हणून परमेश्वराने ते तुम्हांला दिले होते;

लेवीय 16:22

तेव्हा तो बकरा त्या लोकांच्या सर्व पापकर्माचा भार घेऊन निर्जन रानात वाहून नेईल; त्या माणसाने त्या बकऱ्याला रानात सोडून द्यावे.

लेवीय 19:8

कोणी तसे करील तर ते पाप केल्यामुळे तो अपराधी ठरेल, कारण त्याने परमेश्वराच्या पवित्र वस्तूचा मान न राखता ती दूषित केली असे होईल; त्या माणसाला आपल्या लोकातून बाहेर टाकावे.

गणना 18:1

परमेश्वर अहरोनला म्हणाला, “या पवित्र जागेविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या तर तू, तुझी मुले, तुझ्या वडिलांच्या कुटुंबातले सगळे लोक त्याला जबाबदार रहाल. तू आणि तुझी मुले याजकांविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल जबाबदार राहाल.

अनुवाद 24:16

“मुलांच्या वागणुकीची शिक्षा म्हणून आईवडलांना देहान्तशासन होऊ नये. तसेच आईवडलांच्या दुष्कृत्याची सजा म्हणून मुलांना ठार करु नये. ज्याच्या त्याच्या दुष्कृत्याची सजा ज्याला त्याला मिळावी.

1 राजे 8:32

तेव्हा तू ते स्वार्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्याला त्याप्रमाणे शिक्षा कर. तो जर निरपराध असेल तर त्याच्या चांगुलपणाच्या प्रमाणात त्याला बक्षीस देऊन त्याचे समर्थन कर.

1 राजे 14:13

सर्व इस्राएल लोक त्याच्यासाठी शोक करतील आणि त्याचे दफन करतील. ज्याचे रीतसर दफन होईल असा यराबामच्या घराण्यताला हा एवढाच कारण फक्त त्याच्यावरच इस्राएलचा देव परमेश्वर प्रसन्न आहे.

2 राजे 14:6

पण त्या मारेकऱ्यांच्या मुलांना त्याने मारले नाही कारण मोशेच्या नियमशास्त्रात याबद्दलचे नियम सांगितलेले आहेत. मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने पुढील आज्ञा सांगितलेली आहे: “मुलांच्या गुन्ह्या करिता आईवडिलांना मृत्युदंड देता कामा नये. तसेच, आईवडिलांनी जे केले त्याबद्दल मुलांना मारले जाऊ नये. अपराधाचे शासन अपराध करणाऱ्यालाच व्हावे.”

2 राजे 22:18

“यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.” हे परमेश्वराचे शब्द आहेत.

2 इतिहास 6:23

तू स्वर्गातून ऐक. तुझ्या सेवकाचा योग्य न्यायनिवाडा कर. ज्याच्या हातून आगळीक घडली असेल त्याला शासन कर. त्याच्यामुळे इतरांना जसा त्रास झाला तसाच याला होऊ दे. ज्याचे वागणे उचित होते तो निर्दोष असल्याचे सिध्द कर.

2 इतिहास 6:30

तेव्हा तू ते स्वार्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस.

2 इतिहास 25:4

पण त्याच्या मुलांना त्याने ठार केले नाही कारण याबाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, “मुलांच्या अपराधासाठी आईवडलांना आणि आईवडलांच्या अपराधासाठी मुलांना मृत्युदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा.”

यशया 3:10

सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. सत्कृत्यांचे फळ त्यांना मिळेल.

यशया 53:11

त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल.

यिर्मया 31:29

“आई-वडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली,पण त्याची चव मात्र मुलांना चाखावी लागली.ही म्हण लोक पुन्हा कधीही वापरणार नाहीत.

यहेज्केल 4:4

“तू तुझ्या डाव्या कुशीवर निजले पाहिजेस आणि इस्राएल लोकांची पापे तू तुझ्या शिरावर घेतलीस असे दाखविणाऱ्या गोष्टी तू केल्या पाहिजेस. तू जितके दिवस डाव्या कुशीवर झोपशील, तितके दिवस तुला त्यांच्या अपराधांचा बोजा वाहावा लागेल.

यहेज्केल 18:4

मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.

यहेज्केल 18:13

एखाद्या गरजूला उसने पैसे दिल्यावर हा दुष्ट मुलगा, त्या कर्जदाराकडून बळजबरीने व्याज घेत असेल. असा दुष्ट मुलगा जगणार नाही. त्याने भयंकर गोष्टी केल्याबद्दल, त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले व त्याच्या मरणाला तोच स्वत : जबाबदार असेल.

यहेज्केल 18:30

का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका.

यहेज्केल 33:10

“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या लोकांशी बोल. कदाचित्. ते लोक म्हणतील, ‘आम्ही पाप केले. नियम मोडले आमची पापे आम्हाला बोजा झाली आहेत. आमच्या पापांनी आम्ही सडलो आता जगण्यासाठी आम्ही काय करावे?’

मत्तय 16:27

कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे. आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.

रोमकरांस 2:6

देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.

इब्री लोकांस 9:28

तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पपारूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.

1 पेत्र 2:24

त्याने स्वत:आमची पापे वाहिली त्याच्या शरीरावर घेऊन वधस्तंभावर वाहिली, यासाठी की आम्ही आमच्या पापाला मरावे. आणि नीतीमत्त्वासाठी जगावे. त्याला झालेल्या जखमांमुळे तुम्हाला आरोग्य मिळाले.

प्रकटीकरण 2:23

तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन.मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंत:करणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचामोबदला देईन.

प्रकटीकरण 20:12

नंतर मेलेलेलहानथोर लोक सिंहासनासमोर उभे राहिलेले मी पाहिले. अनेक पुस्तके उघडलेली होती. आणि आणखी एक. म्हणजे जीवनीपुस्तक उघडले होते. आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या त्या मेलेल्या लोकांच्या कृतीप्रमाणे त्यांचा न्यायनिवाडा करण्यातआला.

प्रकटीकरण 22:12

“पाहा! मी लवकर येत आहे, आणि माझे वेतन तुमच्याकरिता घेऊन येईन. प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार मी फळदेईन.

Interlinear

Choose Theme