Home Bibles यहेज्केल 32:9 · मराठी बायबल
यहेज्केल 32:9 · मराठी बायबल

“मी तुझा नाश करण्यासाठी शत्रूला आणले हे ऐकून पुष्कळ लोक अस्वस्थ व दु:खी होतील. तुला अनोळखी असलेली राष्ट्रेसुध्दा अस्वस्थ होतील.

Cross references

निर्गम 15:14

इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.

यिर्मया 25:15

परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.

यहेज्केल 29:12

चाळीस वर्षे कोणीही तेथे राहणार नाही. मी मिसऱ्यांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकीन. मी त्यांना परदेशात रोवीन.”

यहेज्केल 30:23

मी मिसरच्या लोकांना राष्ट्रां-राष्ट्रांत विखरुन टाकीन.

यहेज्केल 30:26

मी मिसरी लोकांना इतर राष्ट्रांत विखरुन टाकेल म्हणजे त्यांना मीच परमेश्वर आहे हे कळेल.”

प्रकटीकरण 11:18

जगातील लोक रागावले पण आता तुझा राग आला आहे, आता मेलेल्या माणसांचा न्याय करण्याची वेळ आली आहे.तुझे सेवक, संदेष्टे यांना बक्षीस देण्याची वेळ आली आहे. आणि तुझ्या पवित्र लोकांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जेलहानमोठे लोक तुझा आदर करतात, त्यांना बक्षिस देण्याची वेळ आली आहे. जे पृथ्वीचा नाश करतात, त्यांचा नाशकरण्याची वेळ आली आहे!”

प्रकटीकरण 18:10

तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”

Interlinear

Choose Theme