Home Bibles यहेज्केल 27:25 · मराठी बायबल
यहेज्केल 27:25 · मराठी बायबल

तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल नेत.“सोर, तू त्या मालवाहू जहाजाप्रमाणे आहेस. संपत्तीने भरलेल्या समुद्रावरील जहाजाप्रमाणे आहेस.

Cross references

1 राजे 10:22

राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.

स्तोत्रसंहिता 48:7

देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.

यशया 2:16

हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.

यशया 23:14

तार्शीशच्या गलबतांनो, तुमचे सुरक्षिततेचे ठिकाण-सोर-हे नष्ट केले जाणार आहे म्हणून तुम्ही शोक करा.

यशया 60:9

दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत. दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत. परमेश्वराचा तुझ्या देवाचा, इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील. परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.

Interlinear

Choose Theme