हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील.
Cross references
तिथे जे लोक तुम्हाला आढळतील त्यांच्यापासून तुम्ही तो प्रदेश घ्याल. तेव्हा तुम्ही त्यांच्या कोरीव पुतळयांचा आणि मूर्तीचा नाश करा. त्यांच्या उंचावरच्या पुजेच्या ठिकाणांचा नाश करा.
राजाकडे अनेक मालवाहू जहाजांचा ताफा होता. त्यांच्या इतर देशांशी व्यापार चाले. ही जहाजे हिरामची होती. दर तीन वर्षांनी ही जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत आणि जनावरे यांचा नवा साठा घेऊन येत.
राजा यहोशाफाटने काही मालवाहू गलबते बांधली. त्यात त्याचा हेतू ओफीरहून सोने आणण्याचा होता. पण ती तेथपर्यंत कधी पोहोंचू शकली नाहीत कारण एसयोन गेबेरच्या बंदरात त्यांची नासधूस करण्यात आली.
देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.)
दूरचे देश माझी वाट पाहत आहेत मोठी मालवाहू जहाजे प्रवासास सज्ज आहेत. दूरच्या देशातून तुझ्या मुलांना आणण्याकरिता ती जहाजे तयार आहेत. परमेश्वराचा तुझ्या देवाचा, इस्राएलच्या पवित्र देवाचा, सन्मान करण्यासाठी ती मुले आपल्याबरोबर चांदी-सोने आणतील. परमेश्वर तुझ्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी करतो.
पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही.
एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!”प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील.