Home Bibles यहेज्केल 27:16 · मराठी बायबल
यहेज्केल 27:16 · मराठी बायबल

तुझ्याजवळ पुष्कळ चांगल्या वस्तू असल्याने अरामने तुझ्याबरोबर व्यापार केला. ते तुझ्या मालाच्या मोबदल्यात पाचू. जांभळे कापड, सुंदर वीणकाम, तागाचे उत्तम कापड, पोवळे आणि माणके देत.

Cross references

उत्पत्ति 10:22

शेम याचे मुलगे; एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम;

उत्पत्ति 28:5

अशी रीतीने इसहाकाने याकोबाला पदन अराम येथे पाठवले; तेव्हा याकोब पदन अराम येथील अरामी बथूवेलाचा मुलगा व आपली आई रिबका हिचा भाऊ, लाबान याच्याकडे गेला.

शास्ते 10:6

इस्राएल लोकांनी परमेश्वराला अमान्य असलेल्या गोष्टी पुन्हा करायला सुरूवात केली. बआल, अष्टारोथ, या दैवतांची तसेच अरामी, सीदोनी, मवाबी, अम्मोनी तसेच पलिष्टी या लोकांच्या दैवतांची त्यानी उपासना करायला सुरुवात केली. आपल्या परमेश्वरापासून ते दूर गेले, त्याची सेवा करणे त्यांनी थांबवले.

2 शमुवेल 8:5

दिमिष्कामधील अरामी लोक हददेजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामींनाही दावीदाने ठार केले.

2 शमुवेल 10:6

आपण दावीदाचे शत्रुत्व ओढवले आहे हे अम्मोन्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी बेथ-रहोब आणि सोबा येथील अरामी माणसे मोलाने धेतली. अराम्यांचे पायदळ वीस हजारांचे होते. शिवाय माका राजाची एक हजार माणसे तसेच तोबचे बारा हजार सैनिक घेतले.

2 शमुवेल 15:8

अराममधील गशूर येथे राहात असताना मी तो बोललो होतो. परमेश्वराने मला पुन्हा यरुशलेमला नेले तर मी परमेश्वराच्या सेनेला वाहून घेईन असे मी बोललो होतो”

यशया 7:1

यहुदाचा राजा आहाज हा योथामचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र. आहाजच्याकारकिर्दीत रसीन हा सिरीयावर राज्य करीत होता तर रमाल्याचा पुत्र पेकह हा इस्राएलचा राजा होता. एकदा रसीन व पेकह हे दोघे यरूशलेमवर चाल करून गेले. पण त्यांना ते शहर काही जिंकता आले नाही.

यहेज्केल 28:13

तू एदेनमध्ये राहात होतास. एदेन हा देवाचा बाग आहे. तुझ्याजवळ माणके, पुष्कराज, हिरे, लसणा, गोमेद, सूर्यंकांत मणी, नीलमणी, वैदूर्य पाच अशी सर्व प्रकारची मोल्यवान रत्ने होती, आणि ती सर्व सोन्याच्या कोंदणात बसविलेली होती. ज्या दिवशी तुला निर्माण केले त्याच दिवशी तुला हे सौदंर्य देण्यात आले. देवाने तुला सामर्थ्यशाली केले.

Interlinear

Choose Theme