Home Bibles यहेज्केल 26:12 · मराठी बायबल
यहेज्केल 26:12 · मराठी बायबल

नबुखद्नेस्सरचे लोक तुमची संपत्ती लुटतील. तुमचा मला बळकावतील. ते तट उद्ध्वस्त करतील आणि तुमच्या सुंदर घरांचा नाश करतील. ते घरांच्या विटा, दगड, तुळ्या कचऱ्याप्रमाणे समुद्रात टाकतील.

Cross references

2 इतिहास 32:27

हिज्कीयाची भरभराट झाली. त्याला मानसन्मान मिळाला. चांदी, सोने, किंमती रत्ने, मसाल्याचे पदार्थ, ढाली इत्यादी नाना तऱ्हेच्या वस्तू ठेवण्यासाठी त्याने कोठारे केली.

2 इतिहास 36:10

राजा नबखद्नेस्सरने वर्षारंभी काही सेवक पाठवून यहोयाखीनला परमेश्वराच्या मंदिरातील बहु मोल खजिन्यासह बाबेलला आणवले.यहोयाखीनच्या नातलगांपैकी सिद् कीया याला नबखद्नेस्सरने येहुदा व येरुशलेमचा राजा केले.

यशया 23:8

सोर शहराने पुष्कळ नेते दिले. तेथील व्यापारी म्हणजे जणूराजपुत्रच. व्यापाऱ्यांना सगळीकडे मान मिळतो. मग सोरविरूध्द कट कोणी रचला?

यशया 23:11

परमेश्वराने आपला हात समुद्रापर्यंत पसरला आहे. सोरविरूध्द लढण्यासाठी तो राज्यांना गोळा करीत आहे. त्याने, तार्शीशचे सुरक्षित ठिकाण सोर नष्ट करण्याची कनानला आज्ञा दिली आहे.

यशया 23:17

सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल.

यशया 32:12

दु:खाने भरलेल्या छातीवर शोकप्रदर्शक कपडे चढवा. रडा! कारण तुमची शेते उजाड झाली आहेत.तुम्हाला द्राक्षे देणारे तुमचे द्राक्षमळे ओस पडले आहेत.

यिर्मया 25:34

मेंढपाळांनो (नेत्यानो) तुम्ही मेंढ्यांना (लोकांना) वळवावे. प्रमुख नेत्यांनो, रडायला सुरवात करा. मेंढ्यांच्या (लोकांच्या) नेत्यांनो, जमिनीवर दु:खाने लोळा. का? कारण ही तुमच्या कत्तलीची वेळ आहे. परमेश्वर तुम्हाला मोडील आणि सगळीकडे पसरवील. तुम्ही फुटक्या मडक्याच्या तुकड्याप्रमाणे सगळीकडे पसराल.

यहेज्केल 26:5

मी सांगतो की ती समुद्रकाठची कोळ्यांची जाळी पसरविण्याची जागा होईल.” परमेश्वरा, माझा प्रभू, म्हणतो, “सोर म्हणजे सैनिकांची मौल्यवान लूट होईल.

यहेज्केल 27:3

तिच्याबद्दल पुढील गोष्टी सांग“सोर, तू समुद्रावरचे प्रवेशद्वार आहेस. तू खूप राष्ट्रांची जणू व्यापारी आहेस. समुद्रकाठाने तू पुष्कळ देशांत प्रवास करतेस. ‘प्रभू, माझा परमेश्वर, पुढील गोष्टी सांगतो.

यहेज्केल 28:8

“ते तुला थडग्यात पोहोचवतील समुद्रात मेलेल्या नावाड्याप्रमाणे तुझी स्थिती होईल.

दानीएल 11:8

तो त्यांच्या देवतांच्या मूर्तो, धातूच्या मूर्तो आणि सोन्या चांदीच्या किंमती वस्तू घेईल तो त्या वस्तू मिसरला नेईल मग काही वर्षे तो उत्तरेच्या राजाला त्रास देणार नाही,

होशेय 13:15

इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.

आमोस 5:11

तुम्ही अन्यायाने गरिबांकडून कर घेता, त्याच्याकडून गव्हाचा खंड वसूल करता. तुम्ही कौरीव दगडांची दिमाखदार घरे बांधता खरी, पण त्यात तुम्ही रहाणार नाही. तुम्ही द्राक्षाच्या सुंदर बागा लावता, पण त्यापासून निघणारा द्राक्षरस तुम्ही पीणार नाही.

नहूम 2:9

निनवेचा नाश करणाव्या सैनिकांनो चांदी सोने लुटा तेथे लुटण्यासारखे पुष्कळ आहे. खूप संपत्ती आहे.

जखऱ्या 7:14

एखाद्या झंझावाताप्रमाणे मी इतर राष्ट्रांना त्यांच्याविरुध्द उठवीन. ज्या राष्ट्रांची त्यांना माहिती नव्हती, अशी राष्ट्रे देशावर आक्रमण करुन त्यांचा नाश करतील आणि हे प्रसन्न राष्ट्र नाश पावेल.”

जखऱ्या 9:3

सोरची बांधणी किल्लयाप्रमाणे आहे. तेथील लोकांनी प्रचांड चांदीचा साठा केला आहे. त्याच्याकडे धुळीसारखी चांदी व मातीसारखे सोने आहे.

मत्तय 6:19

“येथे पृथ्वीवर स्वत:साठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नतील.

प्रकटीकरण 18:11

पृथ्वीचे व्यापारी तिच्यासाठी रडतील आणि शोक करतील, कारण आता त्यांचा माल कोणीही घेणार नाही.

Interlinear

Choose Theme