Home Bibles यशया 23:17 · मराठी बायबल
यशया 23:17 · मराठी बायबल

सत्तर वर्षांनंतर परमेश्वर सोरबद्दल फेरविचार करील. आणि आपला निर्णय देईल. तेथे परत व्यापार सुरू होईल. ती पृथ्वीवरील सर्व देशांची वारांगना होईल.

Cross references

अनुवाद 23:18

पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.

यिर्मया 25:11

ती सगळी भूमी वैराण वाळवंट होईल तेथील सर्व लोक, 70 वर्षांपर्यत बाबेलच्या राजाचे दास होतील.

यिर्मया 29:10

परमेश्वर असे म्हणतो, “सत्तर वर्षापर्यंत बाबेल सामर्थ्यशाली राहील. त्यानंतर बाबेलमध्ये राहणाऱ्या तुम्हा लोकांकडे मी येईन. तुम्हाला यरुशलेमला परत आणण्याचे सुवचन मी पूर्ण करीन.

यहेज्केल 16:26

मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास.

यहेज्केल 16:31

देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास.पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस.

यहेज्केल 22:13

“देव म्हणाला, ‘इकडे पाहा! मी जोराने हात आपटून तुम्हाला थांबवीन. लोकांना फसविल्याबद्दल व ठार मारल्याबद्दल मी तुम्हाला शिक्षा करीन. 14त्यो वेळी तुम्हाला धैर्य राहील का?मी शिक्षा करायला येईन तेव्हा तुम्हाला शक्ती राहील का? नाही! मी परमेश्वर आहे. मी हे बोललो आहे आणि मी बोलल्याप्रमाणे करीन.

यहेज्केल 27:6

त्यांनी तुझी वल्ही बाशानमधील अल्लोन वृक्षापासून बनविली. त्यांनी तुझ्या डेकवरील खोली कित्ती बेटावरच्या बावस लाकडाची बनविली व ती हस्तिदंताने सजविली.

होशेय 12:7

“याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत.

मीखा 1:7

तिच्या सर्व मूर्तीचे तुकडे तुकडे केले जातील. तिच्या वेश्येची संपत्ती (मूर्ती) आगीमध्ये भस्मसात होईल. तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या पुतळ्यांचा मी नाश करीन. का? कारण शोमरोनने माझ्याशी विश्वासघात करुन सर्व धन मिळविले.म्हणून माझ्याशी एकनिष्ठ नसलेल्या लोकांमार्फत तिची संपत्ती घेतली जाईल

मीखा 3:11

यरुशलेमचे न्यायाधीश, न्यायालयात कोणी जिंकायचे, हे ठरविण्यासाठी लाच घेतात. यरुशलेममधील याजकांना लोकांना शिकवण देण्यापूर्वी लोकांनी पैसे द्यावेच लागतात. भविष्य बघण्यापूर्वीच संदेष्ट्यांना पैसे चारावे लागतात. आणि मग हे नेते अपेक्षा करतात की परमेश्वराने त्यांना मदत करावी. ते म्हणतात, “आपले काहीही वाईट होणार नाही. कारण परमेश्वर आपल्याबरोबरच राहतो!”

नहूम 3:4

हे सर्व निनवेमुळे झाले निनवे अतिशय हाव असलेल्या वेश्येप्रमाणे आहे तिला आणखी हवे होते तिने स्वत:ला पुष्कळ राष्ट्रांना विकळे आणि आपल्या जादने त्यांना गुलाम बनविले.

सफन्या 2:7

त्यानंतर ती भूमी यहूदातील जिवंत राहिलेल्या लोकांच्या मालकीची होईल. यहूदातील ह्या लोकांची परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर आठवण ठेवील. आता ते परदेशांत कैदेत आहेत. पण परमेश्वर त्यांना परत आणील. मग यहूदातील लोक, आपल्या मेंढ्यांना त्या कुरणांत चरु देतील. संध्याकाळी, ते अष्कलोनमधील रिकाम्या घरात आडवे होतील.

प्रेषितांचीं कृत्यें 15:14

शिमोन (पेत्र) याने यहूदीतर लोकांना देवाने आपले प्रेम कसे दाखविले ते सांगितले. पहिल्यांदाच देवाने यहूदीतर लोकांना स्वीकारले. आणि त्यांना आपले लोक बनविले.

1 तीमथ्याला 3:3

तो मद्य पिणारा नसावा, तो हिंसक वृत्तीचा नसावा तर तो सभ्य, आत्मसंयमी, आदरणीय, व आदरातिाथ्य करणारा असावा. तो शिकविण्यात प्रवीण असावा.

1 तीमथ्याला 3:8

त्याचप्रमाणे, विशेष मदतनीसआदरणीय असावेत, ते दुटप्पी नसावेत, ते विश्वसनीय असावेत. ते अति मद्यपान करणारे व दुतोंडे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी.

1 पेत्र 5:2

तुमच्या देखभालीसाठी असलेल्या देवाच्या कळपाचे संगोपन करा. व त्याचा सर्वांगीण काळजीवाहक असल्यासारखे त्या कळपाचे पालनपोषण करा. तुम्हांला बळजबरीने करायला सांगितले म्हणून नाही, तर देवाला पाहिजे म्हणून स्वसंतोषाने कळपाचे पालनपोषण करा. तुम्ही पैशाचे लोभी आहात म्हणून काम करु नका तर तुम्ही सेवा करण्यास अधीर आहात म्हणून सेवा करा.

प्रकटीकरण 17:1

सात वाट्या असलेल्या सात देवदूतांपैकी एक जण माइयाकडे आला आणि मला म्हणाला, “ये, मी तुला त्या अति नीचवेश्येला झालेली शिक्षा दाखवतो. ती बहुत जलांवर बसली आहे.

प्रकटीकरण 18:9

पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.

प्रकटीकरण 19:2

कारण त्याचे न्यायनिवाडे खरे आणि योग्य आहेत ज्या मोठ्या वेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने सर्व पृथ्वी भ्रष्ट केली,तिला देवाने शिक्षा केली आहे. त्याच्या सेवकाच्या रक्ताचा त्याने सूड घेतला आहे.”

Interlinear

Choose Theme