तुमचे दृष्टान्त निरुपयोगी आहेत. तुमचे मंत्र-तंत्र तुम्हाला मदत करणार नाहीत. ते म्हणजे असत्याचे गाठोडे आहे. तलवार दुष्टांच्या चाळ्याला भिडली आहे. लवकरच त्यांची फक्त कलेवरे उरतील त्यांची वेळ आली आहे. त्यांची पापे भरली आहेत.
Cross references
पश्र्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट माणसाचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने बधीर होतील.
परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
तुला खूप सल्लागार आहेत. त्यांनी दिलेल्या सल्याचा तुला वीट आला का? मग ग्रहनक्षत्रे पाहून ज्योतिष सांगणाऱ्यांना पाठव. ते तुला महिन्याची सुरवात कधी आहे हे सांगतात; तर कदाचित् तुझा त्रास कधी सुरू होणार हे ही सांगू शकतील.
जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते. मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो. मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो.
तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.”
तुझ्या संदेष्ट्यांनी तुझ्यासाठी दृष्टान्त पाहिले. पण त्यांचे दृष्टान्त म्हणजे निरर्थक व मुर्खपणाचे होते. तुझ्या पापाबद्दल त्यांनी उपदेश केला नाही. त्यांनी स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. पण त्यांनी खोटे संदेश देऊन तुला मूर्ख बनविले.
“ह्या पुढे इस्राएलला खोटे दृष्टान्त दिसणार नाहीत, हे मात्र अगदी खरे आहे. खोटेनाटे सांगणारे जादूगार तेथे असणार नाहीत.
“खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत.
“ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात.
तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”
आणि, इस्राएलच्या दुष्ट नेत्या, तुम्हाला ठार केले जाईल. तुझ्या शिक्षेची वेळ आली आहे, अंत जवळ आला आहे.”
“संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
का? कारण तू नेहमीच माझ्या माणसांच्या विरुद्ध होतास. इस्राएलच्या अखेरच्या शिक्षेच्या वेळी, त्यांच्या संकटकाळी, तू त्यांच्यावर तलवार चालविलीस.”
मी त्याचे अपराध लक्षात ठेवीन, असे त्या लोकांना वाटत नाही. त्याची दुष्कृत्ये सगळीकडे पसरली आहेत. मला त्यांची पापे स्पष्ट दिसू शकतात.