Home Bibles यहेज्केल 16:21 · मराठी बायबल
यहेज्केल 16:21 · मराठी बायबल

“तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस.

Cross references

लेवीय 18:21

“तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे.

लेवीय 20:1

परमेश्वर मोशेला म्हणाला,

अनुवाद 18:10

आपल्या पोटच्या मुलाबाळांचा यज्ञाची वेदीवर बळी देऊ नका. ज्योतिषी, चेटूक करणारा, मांत्रिक यांच्या नादी लागू नका.

2 राजे 17:17

आपल्या पोटच्या मुलामुलींचा अग्नित बळी दिला. भविष्याचे कुतूहल शमवण्यासाठी जादूटोणा आणि मंत्रतंत्र यांचा अवलंब केला. परमेश्वराने ज्या कृत्यांचा धिक्कार केला तेच करण्यापायी स्वत:लाही विकले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतला.

2 राजे 21:6

आपल्या मुलाचाच बळी देऊन मनश्शेने त्याला वेदीवर जाळले.जादूटोणा, मंत्रतंत्र, भुतंखेतं यांच्यामार्फत भविष्य जाणून घ्यायचा मनश्शेला नाद होता.परमेश्वराने जे जे गैर म्हणून सांगितले ते ते मनश्शे करत गेला. त्याने परमेश्वराचा कोप झाला.

2 राजे 23:10

हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलख या दैवताला आपल्या मुलांचा बळी देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशीयाने हे स्थान पुन्हा वापरता येऊ नये अशातऱ्हेने भ्रष्ट करुन टाकले.

2 इतिहास 28:3

बेन हिन्नोमच्या खोऱ्यात त्याने धूप जाळला. आपल्या पोटच्या मुलांना त्याने अग्नीमध्ये आहूती करुन बळी दिले. या प्रदेशात राहणारे लोक जे भयंकर पाप करीत तेच त्याने केले. इस्राएल लोकांनी या भूमीवर पाऊल ठेवले तेव्हा परमेश्वराने त्या लोकांना तिथून घालवले होते.

स्तोत्रसंहिता 106:37

तचीच मुले मारली आणि मुले त्या राक्षसांना अर्पण केली.

यिर्मया 19:5

यहूदाच्या राजाने बआल दैवतासाठी उच्चासने बांधली. लोक ह्या जागांचा उपयोग आपल्या मुलांना अग्नीत जाळण्यासाठी करतात. बआल दैवताला होमबली अर्पण केल्याप्रमाणे ते आपली मुले जाळतात. मी त्यांना असे करायला सांगितलेले नाही. मी तुमच्याजवळ तुमच्या मुलांचे बळी मागितलेले नाहीत. अशा कधीही माझ्या मनातही आल्या नाहीत.

यहेज्केल 20:26

त्यांच्या दानांबरोबर मी त्यांना अमंगळ होऊ दिले. त्यांनी स्वत:च्याच पहिल्यां अपत्यांचेसुध्दा बळी देण्यास सुरवात केली. अशा रीतीने, मी त्यांचा नाश केल्यावर त्यांना मीच परमेश्वर आहे. हे समजेल!’

Interlinear

Choose Theme