पवित्र स्थानात सेवाकरण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे आणि याजक ह्या नात्याने सेवाकरण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या मुलांची पवित्र वस्त्रे.”
Cross references
परमेश्वर मोशेला म्हणाला, “याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे मुलगे नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे यावयास सांग.
अहरोन व त्याच्या मुलांनी याजक या नात्याने माझी सेवा करताना घालावयाची, विणिलेली तलम व पवित्र वस्त्रे;
पवित्र स्थानात सेवा करताना याजकांनी घालावयाची निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताची पवित्र वस्त्रे कारागिरांनी तयार केली; अहरोनासाठीही परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.
पवित्र निवास मंडप, म्हणजे दर्शन मंडप सेवा करण्यासाठी विणलेली वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या मुलांची वस्त्रे;
“इस्राएल लोक आपला तळ नवीन जागी हलवितील तेव्हा अहरोन व त्याच्या मुलांनी दर्शनमंडपात जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने पवित्र कराराचा कोश झाकावा.