त्याच्या बरोबर काम करण्याकरता दान याच्या वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब यालाही मी निवडले आहे; बाकीच्या कारागिरांना मी कौशल्य दिले आहे त्यामुळे ते सर्व मिळून मी तुला सांगितलेली सर्व कामे बरोबर करतील.
Cross references
परमेश्वर मोशेवर रागावला! परमेश्वर म्हणाला, “मी तुला आणखी मदत देतो. लेवी कुटुंबातील तुझा भाऊ अहरोन याचा मी उपयोग करतो. तो पटाईत वक्ता आहे. तो अगोदरच तुझ्याकडे योण्यास निघाला आहे. तुला भेटल्यावर त्याला आनंद होईल.
इस्राएल लोकांना मिसर देशातून बाहेर घेऊन जा असे देवाने ज्यांना सांगितले होते ते अहरोन व मोशे ह्याच कुळातले.
ही वस्त्रे बनविणारे कारागीर इस्राएल लोकात आहेत; ही विशेष कला मीच त्यांना दिलेली आहे; ह्या वस्त्रामुळे अहरोन माझी याजकीय सेवा करण्यासाठी पवित्र होईल मग त्याने याजक या नात्याने माझी सेवा करावी.
मोशे सर्व इस्राएल लोकांस म्हणाला, “परमेश्वराने दिलेल्या आज्ञा अशा.
“जे तुम्ही कारागीर आहात त्या तुम्ही परमेश्वराने आज्ञा केलेल्या सर्व वस्तू तयार कराव्यात म्हणजे,
ज्या स्त्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.
परमेश्वराने त्याला आणि दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब, याला ह्या विशेष कला इतरांना शिकविण्याचे सामर्थ्य दिले आहे.
मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाचा एक पवित्र कोश (पेटी) बनविला; तो पंचेचाळीस इंच लांब, सत्तावीस इंच रुंद व सत्तावीस इंच उंच होता.
तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निव्व्या, व जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढण्याचा कामात तरबेज होता.
परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला,
तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तू ज्ञानी आणि चाणाक्ष होशील तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला नाही आणि पुढे कधी होणार नाही.
अशा तऱ्हेने शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याला 480 वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथे वर्षे होते. वर्षाचा दुसरा महिना जिव चालू होता.
यरुशलेममधील मोरिया पर्वतावर शलमोनाने परमेश्वराचे मंदिर बांधायला सुरुवात केली. शलमोनाचे वडील दावीद याला परमेश्वराने याच मोरिया पर्वतावर दर्शन दिले होते. दावीदाने तयार करुन ठेवलेल्या या जागेवर शलमोनाने मंदिर बांधले. ही जागा म्हणजेच ते अर्णान यबूसीचे खळे.
त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या वतीने संदेश सांगू लागले. यहूदा व यरुशलेममधील यहूद्यांना त्यांनी उत्तेजन दिले.
परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते.
एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते.
पूर्वेकडे तोंड असलेल्या दाराजवळ त्या माणसाने मला नेले.
बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान,
या घटनांनंतर प्रभुने इतर बहात्तर जणांचीनेमणूक केली. आणि येशूने त्यांना जोडीजोडीने पाठविले. त्याला ज्या ठिकाणी जायचे होते त्या प्रत्येक गावात व ठिकाणी त्याने त्यांना पाठविले.
ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला माझ्याकडे द्या. एक खास काम त्यांच्याकडून मला करवून घ्यायचे आहे. हे काम करण्यासाठी मी त्यांना निवडले. आहे”
पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
म्हणून जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे. जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो, आणि जो दोष शोधीत नाही, असा देव ते त्याला देईल.
माझ्या प्रिय बंधूंनो, स्वत:ची फसवणूक होऊ देऊ नका.