Home Bibles निर्गम 29:35 · मराठी बायबल
निर्गम 29:35 · मराठी बायबल

“अहरोन व त्याच्या मुलांनी समर्पण विधीच्या सात दिवसात मी तुला आज्ञा केलेल्या ह्या सर्व गोष्टी कराव्यात.

Cross references

निर्गम 29:30

अहरोनाच्या जागी त्याचा जो मुलगा याजक होईल त्याने पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी दर्शनमंडपात जाताना ती वस्त्रे सात दिवस घालावीत.

निर्गम 29:37

सातही दिवस वेदी शुद्ध व पवित्र करावी; ती ह्या दिवसात जास्तीत जास्त पवित्र होईल, इतकी पवित्र की तिला कशाचाही स्पर्श झाला तर तेही पवित्र होईल.

निर्गम 39:42

परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.

निर्गम 40:12

“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारापाशी नेऊन त्यांना आंघोळ घाल.

लेवीय 8:4

परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. लोक दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले.

लेवीय 14:8

“मग शुद्ध ठरवावयाच्या माणसाने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करुन घ्यावे आणि पाण्याने स्नान करावे म्हणजे तो शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने छावणीत यावे; तरी त्याने सात दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे;

योहान 16:14

जे माझे आहे त्यातून घेऊन आणि ते तुम्हांला कळवून तो माझे गौरव करील.

Interlinear

Choose Theme