समर्पित केलेल्या मांसातले किंवा भाकरीतले जर काही सकाळपर्यत उरले तर ते जाळून टाकावे, ते खाऊ नये कारण ते पवित्र आहे; ते फक्त पवित्र ठिकाणी व विशेष वेळी खाण्यासारखे आहे.
Cross references
त्या रात्रीच ते सर्व मांस खावे; त्यातले काहीही सकाळपर्यंत ठेवू नये आणि जर काही उरलेच तर ते आगीत जाळून टाकावे.”
मोशेने लोकांना सांगितले, “दुसऱ्या दिवसासाठी ते अन्न ठेवू नका.”
“तो मेंढा अहरोनाच्या समर्पण विधीसाठी असल्यामुळे त्याची चरबी, आणि त्याच्या शेपटावरील व आतड्यावरील चरबी ही घ्यावीत;
“मग त्या मेंढ्याचे ऊर घेऊन परमेश्वरासमोर विशेष अर्पण म्हणून वर धरावे; मग ते तुझ्याकरिता तुझ्याजवळ ठेव.
इस्राएल लोकांनी अहरोन व त्याचे मुलगे यांना अर्पणाचा हा हिस्सा नेहमी द्यावा; ते जेव्हा परमेश्वराला अर्पणे आणतील तेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाच्या हक्काचा म्हणून राहील; आणि इस्राएल लोक जेव्हा अर्पणाचा हा भाग याजकाला देतील तेव्हा ते परमेश्वराला दिलेल्या समर्पणासारखे होईल.
शांत्यर्पणाच्या यज्ञबलीच्या मांसातून तिसऱ्या दिवशी मांस जर तो खाईल तर परमेश्वराला ते आवडणार नाही, व तो ते अर्पण मान्य करणार नाही; ते अर्पण अमंगळ होईल; त्या पापाबद्दल भोगाव्या लागणाऱ्या शिक्षेस तो स्वत: जबाबदार राहील.
मांस व भाकर ह्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाका;
मोशेने पापार्पणाच्या बकऱ्याची बारकाईने विचारपूस केली असता तो जाळून टाकल्याचे त्याला कळाले; तेव्हा अहरोनाचे मुलगे एलाजार व इथामार ह्यांच्यावर मोशे भयंकर रागावला; तो म्हणाला,