“इस्राएल लोकांनी दीपवृक्ष सतत जळत ठेवण्यासाठी जैतुनाचे उत्तम तेल रोज संध्याकाळी आणावे अशी तू त्यांना आज्ञा कर;
Cross references
“मग तू एक दीपवृक्ष तयार कर. शुद्ध सोने वापर व ते ठोकून बैठक व दांडा घडव शुद्ध सोन्यापासून फुले, कव्व्या व पाकळ्या तयार कर. व हे सर्व एकत्र जोडून एकसंध कर.
शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव.
परमेश्वर मोशेला म्हणाला,
“इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतुनाच्या हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे;
जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, “सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?”
परमेश्वराचा पवित्र कोश परमेश्वराच्या पवित्र मंदिरात होता, तेथे शमुवेल झोपलेला होता. परमेश्वरापुढचा दिवा अजून जळत होता.
परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शंत्रूसमोर त्यार केलेस तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस माझा प्याला आता भरुन वाहू लागला आहे.
मग मी (जखऱ्या) त्याला म्हणालो, “मी दिवठाणाच्या उजव्या व डाव्या बाजूस एकेक जैतुनाचे झाड बघितले. त्या जैतुनाच्या दोन झाडांचा अर्थ काय?”
हे दोन साक्षीदार म्हणजे दोन जैतुनाची झाडेआहेत. आणि पृथ्वीच्या प्रभुसमोर असणाऱ्या दीपसमया आहेत.